दाबेली सॅंडविच / Dabeli Sandwich

For English version, please scroll down

 

मुंबईत स्ट्रीट फुड म्हणून दाबेली बर्‍यापैकी लोकप्रिय आहे, पण तो एकंदर अवतार बघून मला ती खावीशी

वाटत नाही. आता त्याचा तयार मसाला मिळू लागला आहे, तसा तो चांगला असतो, पण माझ्या जिभेला तरी

तो फार ऊग्र वाटतो. बहुदा लवंगा जास्त वापरत असावेत.

dabeli sandwish dish

 

 

 

तो तयार मसाला वापरून केलेली हि सँडविचेस. भारतात हि मुलांच्या पार्टीसाठी केली होती.

अशा पार्टीसाठी पावभाजीपेक्षा हा प्रकार मला सुटसुटीत वाटला. एकतर यासाठी प्लेट घ्या, आणि ती संभाळत

बसा, हे चुळबूळ्या मूलांना न आवडणारे प्रकरण, रद्द होते. दुसरे म्हणजे फिंगर फूड असल्याने, हातात धरून,

बाकीची मस्ती, सहज करता येते. मूलांनाच रुचावी, म्हणून मी ती बरीच सौम्य केली होती.

 

लागणारे जिन्नस असे :-

 

१) तयार दाबेली मसाल्याचे १ पाकिट ( हे साधारण ५० दाबेलीसाठी असते )

२) अर्धा किलो बटाटे, उकडून, कुस्करून ( बटाटे चिकट नसावेत, पिठूळ असावेत. बटाटे उकडताना भरपूर मीठ

घातले कि चिकटपणा कमी होतो. पण बटाटे सालासकट असतील तर खारट होत नाहीत. ) मी पोटॅटो फ्लेक्स

वापरले आहेत. या पदार्थात ते वापरणे फार सोयीचे होते. दोन कप फ्लेक्स पुरेसे होतील.

३) अर्धवट पिकलेले १ केळे, बारीक तूकडे करून.

४)   एक मध्यम बीट वा गाजर, बारीक किसून

५) १६ ते २० पावाच्या स्लाईसेस

६) खारे दाणे सोललेले.

मुंबईत या दाबेली सोबत, बारीक शेव, डाळींबाचे दाणे वगैरे असतात. त्यापैकी आवडेल ते. मी टॅकोज ठेवलेत.

७) बटर किंवा तेल

dabeli sandwish sahitya

 

 

 

क्रमवार पाककृती

 

१ ) एका भांड्यात थोडे तेल वा बटर तापवून, मंद आचेवर हा मसाला परतून घ्या. मग त्यावर केळे घाला, थोडे परता.

 

२) केळ्याला पाणी सुटले कि बीटचा वा गाजराचा किस टाका, तो थोडा परता आणि झाकण ठेवून जरा मऊ करून घ्या.

 

३) मग त्यावर बटाट्याच्या लगदा टाकून नीट मिसळून घ्या. परतून मिश्रण बर्‍यापैकी कोरडे करून घ्या.

 

४) पावाच्या स्लाईसेस, थोड्या टोस्ट करून घ्या. त्यावर थोडे बटर लावून, या मिश्रणाचा अर्धा सेमी चा थर

द्या. त्यातच काही खारे दाणे आयत्या वेळी पसरा.

 

५) मग त्याचे दोन किंवा चार तूकडे करा. ( अगदी लहान मूले असतील तर चार तूकडे केले तर त्याना सोयीचे

होते.

 

६) खाण्यापुर्वी तव्यावर मंद आचेवर ठेवून कुरकुरीत करून घ्या.

 

 

 

मी वर तयार मसाला वापरला असे लिहिले आहे, तो घरी पण करता येईल.

 

१) ३ काश्मिरी मिरच्या

२) १ मसाला वेलची ( फक्त दाणे )

३) जिरे २ टिस्पून

४) धणे ४ टिस्पून

५) दालचिनी ३ इंच

६) मिरी १ टेबलस्पून

७) लवंगा ३/४

८) थोडीशी जायपत्री

हे सगळे तेलात थोडे परतून बारीक पावडर करायची. हे माझे व्हर्जन, बाजारी मसाल्यात लवंगा आणि मिरी खुप जास्त असतात. तेलात फार परतायचे नाही, कारण आयत्यावेळी हा मसाला परत परततोच आपण.

असा मसाला केला, तर केळे वगळले तरी चालेल. पण तरीही केळ्याची चव मुलांना आवडते, असा अनुभव आहे.

 

या प्रमाणात माईल्ड मसाला तयार होईल. केळे वापरले नाही तर थोडी साखर घ्या, म्हणजे साधारण बाजारात मिळते तशी चव येईल.

 

 

Dabeli Sandwich

dabeli sandwish close up

 

 

 

 

Dabeli ( literally meaning pressed ) is a popular street food of Mumbai. A round bun bread is

stuffed with spicy potato mixture, the bread is pressed, heated and served with roasted peanuts.

The spice mixture used is very hot, which does not agree with my taste. I have used the readymade masala, but it can be made at home too.

 

Here I have created a milder version of this street food, by using sandwich bread. It was very popular among my young friends, who also do not like to eat too spicy food.

 

So you will need –

 

1) One dabeli masala packet ( If you cannot find it, I have given it’s ingredients at the end of this recipe )

2) Half kg potatoes, boiled peeled and mashed. Or 2 cups potato flakes.

3) 1 semi ripe banana, peeled & chopped

4) A small beetroot or carrot, finely grated.

5) 16 to 20 bread slices (To make about 8 to 10 sandwiches, which can be cut into two or four pieces each )

6) 1 cup, roasted, salted peanuts.

7) Butter or oil as needed.

 

In Mumbai, it is served with fine sev, pomegranate seeds, small grapes etc. I have used tacos instead.

 

To proceed.

 

1) Heat about 2 teaspoon butter or oil in a pan, and slightly roast the masala on very low flame for 1 minute.

 

2) Add the pieces of Banana and cook till it softens, then add grated carrot or beetroot.

3) Cover and let it cook for 2 minutes,   then add the mashed potatoes and mix very well.

(The readymade masala contains salt, hence add salt only if required ). Cook till the mixture binds together.

4) Toast the bread slices, add apply butter. Spread this mixture and press another slice on it. Add some roasted peanuts to the mixture, just before spreading it on the bread slices.

5) Cut the sandwiches into 2 or 4 pieces.  Warm the sandwiches on a pan, just before serving or eating.

 

To make dabeli masala at home.

1) 3 Kashmiri red chilies

2) 1 masala brown ) cardamom , peel and take only the seeds.

3) 2 teaspoon cumin seeds.

4) 4 teaspoons coriander seeds.

5) 3 inch, cinnamon

6) 1 Tablespoon black pepper corns

7) 3 cloves

8) A pinch of mace ( javitri)

 

Slightly roast all the dry spices and grind to a fine powder. Add salt and little oil to it. It can be made in advance and can be kept in air tight container upto 2 weeks.

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s