मालवणी पद्धतीने भजीचे कालवण / Onion Pakoda in Malvani gravy

For English version, please scroll down

 

आम्ही मूळचे राजापूरचे, पण माझे आजोबा मालवणला ( खुद्द मालवणात ) येऊन स्थायिक झाले. म्हणून मी मालवणीच ( म्हणायचा)

दहावीपर्यंत मी दर मे महिन्याच्या सुट्टीत मालवणला जात असे, पुढे ते खुप अनियमित झाले आणि आता तर थांबलेच आहे.

माझे बाबा आणि काका आत्या मिळून दहा भावंडे, त्यापैकी सात आठ तरी त्या काळात एकत्र येत असत. मग रोज एकेक काकी, किंवा आत्या एखादा खास पदार्थ करत असे. तर ही भज्यांची भाजी हि एका ( सावंतवाडीच्या ) काकीची खासियत.

Onion pakoda in malvani gravy dish

 

 

साधारणपणे मालवणी माश्याचे कालवण केले जाते तसाच हा प्रकार आहे. पण अर्थातच शाकाहारी. खोबर्याचे वाटण, हा जसा बहुतेक मालवणी पदार्थांचा पाया असतो, तसाच इथेही. पण मालवणी वाटणाचे वेगळेपण म्हणजे ते पाट्यावर वाटलेले असल्याने, जरा सरबरीतच असते. गोव्यातील रगड्यावरील वाटपाप्रमाणे गंधासारखे ( उगाळलेले चंदन ) नसते. मालवणी पदार्थात खोबरे हवेच ( नवीन घर घेताना, माड किती हा कळीचा मुद्दा असतो ) पण तरीही खोबर्याचे प्रमाण किती यावरुन, सुकं, कालवण, दबदबीत, कढी, सार, लिपतं असे शब्द वापरतात.

 

ती कृती देण्यापुर्वी थोडेसे मनातले.

 

मालवणला गेल्यावर कधी हॉटेलमधे जाऊन खाण्याचा प्रश्नच नव्हता. ( ज्याला कुणी नसतं, तो हाटीलात जाऊन खातो, हे आजीचे मत ) आणि त्याकाळात मालवणला हॉटेलदेखील फारशी नव्हतीच, एखादी खाणावळ असेल.

 

पण सध्या मालवणी म्हणून हॉटेलात जे (तिखटजाळ) पदार्थ मिळतात, तसे आमच्या घरी कधीच बनत नसत. मालवणी कोंबडीवडे म्हणून जो प्रकार गाजवला जातोय, त्याचेही मला नवलच वाटतेय.

कोंबडीवडे हा शब्दही नवाच. ( अनेकांना ते दोन वेगळे प्रकार आहेत, तेदेखील माहीत नसतं ) कोंबडी आताएवढी सहज बाजारात ( अगदी मुंबईतही ) मिळत नसे. ती करायची तर घरीच कापावी लागे. तरीही कोंबडी हा काही खास

पाहुणचाराचा प्रकार नव्हता. कारण मासे मुबलक मिळत असत. ( बांगडे तर असतच, पण मोरी, मूळे, कुर्ल्या, पेडवे पण असतच. ) आमच्या घराजवळच्या राजकोटाच्या खडपात ( खडकात ) कालवं आणि वेळेवर ( समुद्रकिनार्यावर ) घुला पण सहज मिळत. एकादे दिवशी काकी सुकती ( ओहोटी ) बघून त्या गोळा करून आणत असे.

 

मी तेव्हाही शाकाहारीच होतो त्यामूळे माझ्यासाठी काळ्या वाटाण्याचे सांबारे, चवळी, वालीच्या शेंगा वगैरे असत.

सगळ्यात भरपूर काजूगर घातलेले. एखादा पाडाचा फणस मिळाला तर त्याची भाजी.

गोड पदार्थात धोंडस ( तवशे मिळाले तर ठिकच नाहीतर कलिंगडाच्या पांढर्या गराचेही ), शिरवळ्या, रस घावण,

चुनकापं वगैरे प्रकार होत. काकांच्याच म्हयशी ( म्हशी ) असल्याने खर्वसदेखील असायचा. शेळी ( शहाळी )

तर घरचीच.

 

वर जे वडे म्हणतोय ते कोंबडीसोबतच नव्हे तर खिरीसोबतही ( तांदळाची अर्थात ) खात. पण तेही कचित प्रसंगी

म्हणजे बारसा ( बारसे ) महाळ ( श्राद्ध ) असेल तरच. मटण आणि वडे हे खुपदा पाच परतावणं ( लग्नानंतरचे

तिखट जेवण ) साठी केले जात.

 

वरच्या यादीतले वडे सोडले तर एकही पदार्थ तळणीचा नाही. मालवणात तळण हे क्वचितच केले जात असे.

पापड सुद्धा शक्यतो भाजलेलेच किंवा तव्यात थोड्या तेलात तळलेले असत.

( नगर भागात पुरणपोळीचा बेत जितक्या सहजपणे आखला जातो तितक्याच सहजपणे कुरड्या तळल्या जातात,

त्याशिवाय त्यांना पाहुणचार झाला असे वाटतच नाही. ) विदर्भातल्या प्रमाणे पदार्थांवर तर्री, किंवा वरून कच्चे तेल

ओतून घेणे, हे मालवणात नसतेच.

 

तर सांगायचा मुद्दा हा कि मालवणात भजी हा बाहेरुन आणून खायचा पदार्थ होता ( जयवंत दळवींच्या मानूला

(महानंदाला) रावसाकडची भजी खाईनशी वाटतात. ) बरं ही भजी पण कांदा भजी असली तरी खेकडाभजी (

हा शब्दही अलिकडचाच ) नसत. तर अशी भजी आणून, तू मुद्दाम शिळी कऊन, दुसर्या दिवशी तिचे असे

कालवण केले जात असे.

 

आता नमनालाच एवढे तेल घातल्याने मूळ कृतीत कमीच वापरीन म्हणतो !!

 

लागणारे जिन्नस असे

 

१) आठ ते दहा तयार कांदा भजी ( ताजी नकोत ) ( मी जरा वेगळ्या प्रकारे ही “भजी” केलीत. त्याची कृती शेवटी

देतो. )

२) अर्धा नारळ

३) ३/४ लाल मिरच्या

४) २ टिस्पून धणे

५) १ टिस्पून बडीशेप

६) चिमूटभर मेथीदाणे

७) एक टिस्पून तेल

८) थोडी राई

९) एखादी हिरवी मिरची

१०) मीठ

११) एक लहान कांदा

१२) ३/४ कोकमं किंवा आगळ

Onion pakoda in malvani gravy sahitya

 

 

 

 

 

माझ्या पद्धतीने भजी करायची असतील तर, लागणारे जिन्नस असे

१) १ मोठा कांदा

२) थोडी कोथिंबीर

३) १ कप बेसन

४) १ टेबलस्पून तांदळाचे पिठ

५) २ टिस्पून लाल तिखट

६) अर्धा टीस्पून हळद

७) अर्धा टीस्पून हिंग

८) थोडा ओवा

९) मीठ

१०) तेल

 

क्रमवार पाककृती

 

अ) तयार कांदा भजी असतील तर…

 

१) कांदा बारीक चिरून घ्या.

२) धणे आणि बडीशेप सर्दावलेले असतील तर थोडे गरम करून घ्या.

३) धणे, बडीशेप, मेथी, खोबरे, मिरच्या, अर्धा कांदा हे सगळे एकत्र वाटून घ्या.

Onion pakoda in malvani gravy in mixer

 

 

 

 

४) थोड्या तेलाची मोहरीची फोडणी करून त्यात उरलेला कांदा परता.

५) त्यावर वाटण व वाटणाचे पाणी घाला.

६) कोकमं किंवा आगळ घाला, मीठ घाला ( आगळ वापरत असाल, तर मीठ त्या बेताने घाला )

७) चांगली उकळी आली कि त्यात हिरवी मिरची ( ऊभी चिरून) घाला आणि भजी सोडा आणि गॅस बंद करा.

भातासोबत खा.

 

माझ्या पद्धतीने भजी करायची असतील तर..

 

१) कांदा अगदी बारीक उभा कापून त्यावर मीठ शिंपडा.

Onion pakoda in malvani gravy cut onion

 

२) त्यावरच कोथिंबीर बारीक चिरून घाला.

३) बेसन, तांदळाचे पिठ, हिंग हळद, तिखट, ओवा सगळे कोरडेच एकत्र करा.

४) कांद्याला पाणी सुटले कि जरा हाताने चुरून त्यावर बेसनाचे मिश्रण हळू हळू घाला.

५) पाणी अजिबात वापरून नका.

६) तव्यात थोडे तेल गरम करा.

७) हाताला थोडे तेल लावून, त्याचे हाताने चपटे वडे करा व ते तेलात मंद आचेवर दोन्ही बाजुंनी

खमंग भाजून घ्या.

Onion pakoda in malvani gravy in pan

 

 

 

८) वरच्या कालवणासोबत खा.

( आधी डिशमधे कालवण घेऊन त्यावर ही “भजी” वाढली तर छान दिसते )

 

 

तर हा माझा मालवणी बेत,

 

भात, पालेभाजी, सोलकढी, भज्याचे कालवण, लोणचं आणि मिरची !

Onion pakoda in malvani gravy plate

 

 

 

 

Onion Pakoda in Malvani gravy

 

We are basically from Malvan, but my father settled in Mumbai, many years back.

We used always visit Malvan during summer vacation , and during those days, all

The aunties would make some special dish, every day.

The onion pakoda ( also known as kanda bhajee or khekada bhajee ) were brought from market and this particular gravy was made the next day.

If you are stationed at a place, where these pakodas are not readily available, I will suggest a novel way of making these at home.

Onion pakoda in malvani gravy close up

 

 

 

 

 

 

So, to start with you need.

  1. A) The gravy

1) 8/10 readymade onion pakodas ( should not be fresh, at least a day old ) ( In case you want to make them my way, please read on. )

2) 2 cups fresh coconut, grated

3) 3 to 4 red dry chilies

4) 2 teaspoon coriander seeds

5) 1 teaspoon aniseed ( saunf )

6) A pinch of fenugreek seeds

7) 1 Teaspoon oil

8) A pinch of mustard seeds

9) 1 green chili, slit open

10) Salt to taste

11) 1 small onion, chopped

12) 3 to 4 cocum or 2 teaspoon tamarind pulp

 

  1. B) if you want to make pakodas at home

 

1) One large onion, cut lengthwise

2) ¼ cup fresh coriander

3) 1 cup besan ( gram flour )

4) 1 tablespoon rice flour

5) 2 teaspoon red chili powder

6) ½ teaspoon turmeric

7) ½ teaspoon asafoetida

8) A pinch of ajwain

9) Salt to taste

10) Oil, as required

 

To make this gravy

A ) If using readymade pakodas

1) Slightly roast the coriander and aniseeds ( saunf )

2) Grind the coconut, coriander , aniseeds, fenugreek seeds, red chilies, half onion to a fine paste.

3) Heat little oil and the mustard seeds, and when the splutter add the remaining half onion.

4) Fry a little and add the coconut paste, add water, salt and cocum or tamarind pulp.

5) Boil till the foam disappears.

6) Add the slit green chili and put off the flame, then add the pakodas.

 

Enjoy with plain rice.

 

  1. B) If you want to make the pakodas at home.

 

1) Cut the onion lengthwise and sprinkle salt over it.

2) Add chopped coriander, add keep aside.

3) In a separate bowl, dry mix together the gram flour, rice flour, asafoetida, turmeric,

chili powder and ajwain.

4) Crush the onion with hand and add the dry mixture to it, mix well. With the onion

Water, it should bind together.

5) Heat little oil in a pan, now by applying little oil to your palms, make small round patties,

And shallow fry them till golden brown on both the sides.

 

6) To serve, take the gravy in a plate and place 2 to 3 pakodas on the gravy. Enjoy as a snack or with plain rice.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s