दामोदा फ्रोम गांबिया / Damoda from Gambia

FOR English version, please scroll down

हा पदार्थ सर्वसाधारण भारतीय चवीच्या जवळपास जाणारा नाही. पण चव कशी लागेल या उत्सुकतेपोटी मी करून

बघितला. मला तरी आवडला.

 

damoda dish

 

गांबिया हा पश्चिम आफिकेतला एक चिमुकला देश. १९६५ साली ब्रिटिश अंमलातून मुक्त झाला. गेल्या फेब्रुवारीमधे त्यांनी स्वातंत्र्याची ५० वर्षे पुर्ण केली. हा पदार्थ त्या देशाचा राष्ट्रीय पदार्थ आहे.

 

शेंगदाणे आणि टोमेटॉ असा बेस असलेली ग्रेव्ही असे याचे स्वरुप आहे. असे कॉम्बिनेशन आपण सहसा करत नाही, पण पस्चिम आफ्रिकेत मात्र हे फार कॉमन आणि लोकप्रिय कॉम्बिनेशन आहे.

यातल्या घटकांबद्दल थोडेसे.

 

सध्या काही आफ्रिकन देशाचे खाद्यपदार्थ जगभर लोकप्रिय होताहेत ( उदा. इथिओपियन ) हॉटेलमधे मिळणारे पदार्थ सहसा मांसाहारीच असल्याने. मूळ पदार्थही मांसाहारीच असतील असा ग्रह होतो खरा. पण ते तितकेसे खरे नाही.

 

अगदी स्वतः शिकार करून प्राणी मारत असतील तर गोष्ट वेगळी, पण एरवी नोकरी करणार्‍या माणसांना मांसाहार

करणे परवडत नाही. त्यांचा आहार मुख्यत्वे शाकाहारीच असतो. अर्थात ज्यावेळी परवडेल, त्यावेळी ते मांसाहार

करतातच.

 

आफ्रिकेच्या तीन कोपर्‍यात ३ वाळवंटे असली तरी जिथे पाणी उपलब्ध आहे तिथे, अगदी वालुकामय जमीन असली तरी ती अत्यंत सुपीक आहे. अनेक भाज्या इथे विनासायास वाढतात. इथे मी जो भोपळा वापरलाय तोही

इथे अमाप पिकतो. भोपळा, भोपळ्याची पाने यांच्या आहारात असतातच, पण त्याशिवाय बियाही असतात. बियांचे वाटण सूपमधे वापरतात. त्याने सूप दाट तर होतेच शिवाय आरोग्यदायी देखील.

भोपळ्याच्या जागी रताळेही वापरता येईल. रताळेही इथे अमाप पिकते. अंगोलात तर बांधकामासाठी आणलेली

वाळू तशीच राहिली तर त्यावरही रताळ्याचे वेल माजतात. रताळ्याची पाने देखील इथे आवडीने खातात.

( भारतात ती तेवढी लोकप्रिय नाहीत. तसेच त्याची भाजी करताना आधी ती तव्यावर भाजावीत असे मंगला बर्वे यांनी लिहिले आह. )

 

शेंगदाणे देखील इथल्या पदार्थात वापरतात. ते भाजून त्याचे केलेले रवाळ पिठ भाज्यांत वापरतात. असे पिठ ताजे करून बाजारात विकायला आलेले असते. सुपरमार्केटमधेही मिळते. मी त्याला पर्याय म्हणून तयार पीनट बटर वापरले आहे.

 

जगभर खाद्यपदार्थात आंबटपणासाठी एखादा घटक वापरतात. मग ते लिंबू असो, व्हीनीगर असो वा इतर काही.

आपल्याकडे चिंच, कोकमही वापरतात. चिंच मूळची आफ्रिकेतली असली तरी इथल्या खाद्यपदार्थात क्वचितच

वापरतात. अंगोलात चिंचेची झाडे भरपूर आहेत, पण ती निव्वळ खाण्यासाठी वापरतात. आंबटपणासाठी टोमॅटो

मात्र खुप लोकप्रिय आहेत.

 

आफ्रिकन लोकांना लाल रंगाचे खुप आकर्षण असते आणि त्यांना टोमॅटो लालभडकच लागतात. पिवळे, केशरी

असले तर त्यांना अजिबात ग्राहक मिळत नाहीत. हिरवे तर बाजारातही येत नाहीत.

पण लाल रंगाचे टोमॅटो, वाहतूक करण्यास अत्यंत अडचणीचे असल्याने बाजारातही ते कमी येतात. त्याजागी

टोमॅटो पेस्ट वापरली जाते. आपल्या हिंगाच्या डबीएवढ्या आकाराच्या टोमॅटो पेस्टच्या डब्या इथे अमाप खपतात.

 

मॅगी क्यूबचेही या लोकांना अमाप आकर्षण आहे. खरे तर त्यात जास्त करुन मीठच असते, पण किंचीत असणार्‍या स्वादासाठी ते वापरले जातात. ( नायजेरियन हाऊसमेड्स तर ते नसतील तर जेवण बनवणारच नाही, असा पवित्रा घेतात. ) आपल्याकडे ते तितकेसे लोकप्रिय नसले तरी, या देशांत ते अगदी छोट्या दुकानातही सहज उपलब्ध असतात.

 

कांदा कापायची पण यांची एक वेगळी स्टाईल आहे. ( भाजी कशी कापलीय यावर त्याची चव बदलते, असा अनुभव

अनेकांनी घेतला असेल. उदा. उभी चिरलेली फरसबी आणि आडवी चिरलेली फरसबी. किसलेली काकडी आणि कोचलेली काकडी वगैरे ) आपण जर कांदा ऊभा चिरायचा असेल तर मूळा पासून देठाच्या दिशेने कापत जातो.

त्याचीच चव आपल्याला आवडते. या देशांत मात्र कांदा कायम आडवाच चिरला जातो. म्हणजे उभे दोन भाग करून मग त्याचे अर्धगोलाकार होतील असे काप काढतात. हीच पद्धत जास्त सोयीची आहे असे माझ्या मेडने

मला सांगायचा प्रयत्न केला होता. तिच्या मते असे कापताना हातात राहिलेला ( न कापलेला भाग ) हा मूळाच्या

गाठीमूळे एकसंध राहतो, तर आपल्या पद्धतीने कांदा आर्धा कापून झाला कि राहिलेला भाग विसकळीत होतो.

 

पण आम्ही दोघेही आपल्या पद्धतीवर ठाम राहिलो आहोत !

 

तर लागणारे जिन्नस असे…

 

१) अर्धा किलो लाल भोपळा ( मी बटरनट वापरले आहे. रताळीही चालतील )

२) १ मोठा कांदा, चकत्या करून

३) २ टेबलस्पून तेल.

४) २/३ लसूण पाकळ्या

५) ३ मध्यम टोमॅटो कापून. ( मी टिनमधले पील्ड टोमॅटोज वापरलेत )

६) १ टेबलस्पून टोमॅटो पेस्ट

७) २ टेबलस्पून पीनट बटर ( किंवा तेवढेच दाण्याचे कूट, पण पाणी घालून वाटलेले )

८) २ मॅगी क्यूब्ज

९) १ टेबलस्पून मिरची पावडर ( चवीप्रमाणे कमीजास्त, पश्चिम आफिकेत स्कॉच बॉनेट नावाच्या अतितिखट मिरच्या वापरतात. )

१०) या शिवाय लागलेच तर मीठ

 

 

damoda sahitya

 

क्रमवार पाककृती

 

१) तेल तापवून त्यात कांदा लाल करून घ्या.

२) मग त्यात लसूण, आणि भोपळा सोडून इतर सर्व पदार्थ घालून थोडे परता.

३) मग त्यात ३/४ कप पाणी घाला त्याला उकळी आली कि भोपळा घाला.

४) झाकण ठेवून, मंद आचेचर शिजवा.

५) हा प्रकार भाताबरोबर खातात.

 

 

 

टोमॅटो आणि कांदा वगळून, चिंच वा दही घालीन भोपळ्याची भाजी आपण करतोच. पण त्यापेक्षा ही फारच वेगळी

लागते.

 

Damoda from Gambia

This is a preparation from a small African Country, called Gambia. This is a simple but tasty recipe, and it is usually eaten with rice. The ingredients like tomato paste and Maggie cubes, are extremely popular in Africa.

 

damoda close up

 

 

 

What you need.

 

1) ½ kilo red pumpkin / butternut / sweet potato – cut into chunks

2) 1 Large onion, sliced

3) 2 Tablespoon oil

4) 2/3 garlic pods, cut

5) 3 red tomatoes, chopped or one tin of peeled tomatoes

6) 1 tablespoon tomato paste

7) 2 tablespoon peanut butter ( or ground peanuts )

8) 2 maggie cubes ( of your choice )

9) 1 Tablespoon chili powder

10) Salt as per taste

 

 

To make Damoda

 

1) Heat oil in pan and fry the sliced onion and brown.

2) Add all other ingredients one by one, except the pumpkin / butternut / sweet potato.

3) Add 3 to 4 cups water and when it boils add the pumpkin / butternut / sweet potato.

4) Cook covered on low flame, till the vegetables are cooked. Adjust the salt.

 

Enjoy with plain rice.

 

 

 

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s