बटाटे भात / Spicy Potato Biryani

For English version, please scroll down

batate bhat dish

 

 

 

 

लागणारा वेळ:

१ तास

लागणारे जिन्नस:

रुचिराच्या दुसर्‍या भागात ” नागपुरी बटाटे-भात” म्हणून एक पाककृती आहे. त्यात काही बदल करुन हा प्रकार मी केलाय. ( मी केलेले बदल नागपुरकरांना रुचतील का ते माहित नाही, म्हणून शीर्षकात तसा उल्लेख केलेला नाही. ) काय बदल केलेत ते ओघात येईलच..

 

अ) भातासाठी

१) २ कप तांदूळ २) फोडणीसाठी तूप व मसाला ( ८/१० मिरिदाणे, २ हिरव्या वेलच्या, १ इंच दालचिनी ) ३) थोडेसे केशर ( ऐच्छिक ) ४) मीठ

 

ब) मूळ कृतीत कच्चा मसाला अर्धी वाटी असे आहे. नागपूरला वर्‍हाडी मसाला नावाने एक मसाला मिळतो, तो वापरता येईल. मी ताजा वापरला. ( नावाप्रमाणे हा मसाला कच्चा वापरायचा असतो पण मुंबईतल्या दमट हवेत तो तसा कदाचित वाटला जाणार नाही. उन्हात वाळवणे शक्य नसल्यास तव्यावर थोडा गरम करून वाटावा )

१) २ टेबलस्पून धणे ३) १ टीस्पून जिरे ४) १ टिस्पून मिरी ५) २ लवंगा ६) १ टिस्पून खसखस ७) २ टिस्पून तीळ ८) २ इंच दालचिनी

 

क) इतर मसाला

१) दोन मोठे कांदे, सोलून मोठे तूकडे करून २) ७/८ लसूण पाकळ्या ३) १ इंच आले ४) अर्धी वाटी सुक्या खोबर्‍याचा किस ५) चवीप्रमाणे तिखट वा लाल ओल्या मिरच्या ६) अर्धी वाटी मलईचे दही ७) हळद व हिंग

 

ड) चार मध्यम बटाटे किंवा ८/१० छोटे बटाटे

याशिवाय सुका मेवा ( काजू, बेदाणे ) वरून पसरण्यासाठी ओले खोबरे कोथिंबीर.. व सोबत एखादी कोशिंबीर.

 

क्रमवार पाककृती:

१) तांदूळ धुवून निथळत ठेवा
२) बटाट्याची साले काढून मोठे असल्यास दोन तुकडे करा व त्याला आणखी एक चिर द्या. छोटे असतील तर भरल्या वांग्याप्रमाणे चिरा पण अखंड ठेवा. ( मूळ कृतीत बटाटे तळून घ्यायचे आहेत. ) व पाण्यात टाकून ठेवा.
३) ब गटातले सर्व मसाले किंचीत शेकून त्याची बारीक पूड करा. मग त्यात सुक्या खोबर्‍याचा किस घालून वाटा.
४) कांदा, लसूण, आले, व मिरच्या किंवा तिखट पण एकत्र बारीक वाटून घ्या.
५) थोड्या पाण्यात बटाटे अर्धवट वाफवून घ्या.
६) थोडे तूप तापवून त्यात बटाटे परता. आधी वाफवलेले असल्याने फार वेळ लागणार नाही.
७) मग त्यात हळद हिंग व दोन्ही वाटणे टाका. ( मूळ कृतीत अर्धे वाटण भातात मिसळायचे आहे. मी भात पांढराच ठेवलाय )
८) कांद्याचा कच्चट वास जाईपर्यंत परता. ( माझ्याकडे कांदे कापून तेलावर परतून ठेवलेले असतात. मी तेच वापरले त्यामूळे वेळ फार कमी लागला. ) मीठ व हवे असेल तर जास्त तिखट टाका.
९) मग त्यात दही घोटून घाला व तूप दिसेपर्यंत परता. ( फार कोरडे करू नका )
१०) दरम्यान दुसर्‍या पातेल्यात तूप तापवून त्यात भातासाठीच्या मसाल्याची फोडणी करा.
११) त्यात ४ कप पाणी ओता व पाण्याला उकळी आली कि त्यात तांदूळ वैरा.
१२) अधून मधून ढवळत मोकळा भात करून घ्या. त्यात मीठ व वापरत असाल तर केशर घाला.
१३) आता बटाटे तळाशी पसरून घ्या. त्यावर भात टाका. त्यावर थोडे तूप टाकून मंद आचेवर ठेवून वाफ येऊ द्या.
१४) प्रत्येकाला वाढताना बटाटे येतील असे वाढा.

 

यात सजावटीसाठी वापरल्यात त्या इराणी बर्बेरीज .. छान चव असते आणि रंग ही ( आधी नाव माहीत नव्हते. )

http://www.essentialingredient.com.au/featured/barberries-the-jewels-of-…

वाढणी/प्रमाण:

चार जणांना पुरेल.

अधिक टिपा:

 

मी सोबत लाल मूळ्याची कोशिंबीर घेतलीत. काजू व बेदाणे ( मूळ कृतीत तळून घालायचे आहेत ) न घेता पिस्ते व अनारदाणे तसेच म्हणजे न तळता घेतलेत. घरचे पुदीन्याचे पान सजावटीत वापरलेय.

माहितीचा स्रोत:

रुचिरा, भाग दोन

 

Spicy Potato Biryani

 

batate bhat close up

 

 

 

This is a spicy Potato Biryani from originally Nagpur, but I have toned it down a bit. You need to collect all the spices and need to prepare various spice mixes. But if you manage to have these spices ready, then this biryani, can be ready in one hour.

 

What you need

 

A ) For the rice

1) 2 Cups basmati rice

2) 2 tablespoon ghee (plus 8/10 pepper corns, 2 green cardamom and 1 inch cinnamon )

3) Pinch of saffron (optional)

4) Salt

 

  1. b) For dry masala

1) 2 tablespoon coriander seeds

2) 1 teaspoon cumin seeds

3) 1 teaspoon black pepper corns

4) 2 cloves

5) 1 teaspoon poppy seeds (khus khus)

6) 2 teaspoon sesame seeds

7) 2 inches cinnamon

 

C)

1) 2 large onions, peeled and cut

2) 7/8 garlic pods

3) 1 inch ginger

4) ½ cup desiccated coconut

5) Chilli powder or dry red chillies as per taste

6) ½ cup creamy curd

7) A pinch of asafoetida

8) 1 teaspoon turmeric

 

  1. D) 4 large or 8/10 small potatoes

 

Dry fruits and fresh coriander, for topping.

 

To make biryani

1) Wash the rice and drain in a colander.

2) Peel the potatoes. If using medium size potatoes, make 4 pieces each. If using small just give two cross cuts, without separating the pieces. And keep them in water.

 

3) Slightly roast all spices in group B and grind them to fine powder. Add desiccated coconut to it and again grind it and keep aside.

4) Grind together onion, garlic, ginger and chillies or chilli powder.

5) Boil the potatoes in salted water till half cooked.

6) Heat some ghee and brown the potatoes (This will not take much time, as they are partly cooked already.)

7) Add the asafoetida and turmeric, then the dry masala and fry a little.

8) Then add the onion paste and fry on low flame, till the raw smell of onion disappears.

 

9) Beat the curd and add to potatoes, stir well and put off the flame. Add more red chilli powder and salt if needed.

10) In another pan, heat little ghee and when it is hot, add the whole spices in group A.

 

11) When they are fried add 4 cups water and let it boil.

 

12) When it boils add the washed rice, salt and saffron (if using )

13) Stirring occasionally, cook the rice partially. The grains should be separate.

 

14) To assemble the biryani, take another heavy bottom pan and spread the potatoes with the gravy in it. Cover it with half cooked rice. Cover and keep it on very low flame.

 

 

 

After 10/15 minutes put off the flame. But open the cover just before eating. Top with dry fruits and fresh coriander and some more ghee.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s