बाजरीची गोड भाकरी / थालिपिठ / Sweet roti of Bajara

For English version, please scroll down

 

हि बाजरीची गोड भाकरी करायला सोपी आहे अगदी नेहमीची भाकरी जमत नसेल, तरीदेखील ही करता येईल.

Bajari sweet bhakari in plate

 

 

लागणारे जिन्नस असे

१) एक वाटी बाजरीचे पिठ ( कमी जास्त लागेल )

२) १ पिकलेले केळे

३) २ टिस्पून साजूक तूप

४) अर्धी हिरवी मिरची ( ऐच्छिक ) बारीक चिरुन

५) चिमुटभर मीठ

६) चिमूटभर वेलची पूड

Bajari sweet bhakari ingredients

 

 

क्रमवार पाककृती

१) केळे सोलून, त्याचे बारीक तूकडे करा.

२) एका पातेल्यात १ टिस्पून तूप गरम करा आणि त्यात मिरचीचे तूकडे घाला. आणि मग केळ्याचे तूकडे घाला.

३) केळे मऊ पडले कि मग त्यात मीठ व वेलची पूड घालून वर बाजरीचे पिठ ( कोरडे) घाला

४) लाकडी उलथन्याने पिठ आणि केळे एकत्र करा. साधारण असे दिसले पाहिजे.

Bajari sweet bhakari mixture in pan

 

 

 

 

जर पिठ कोरडे वाटले तर पाण्याचा हबका मारा.

५) झाकण ठेवून १ मिनिट गॅसवर ठेवा.

६) मग मिश्रण जरा निवल्यावर मळून घ्या. हे मिश्रण भाकरीच्या पिठापेक्षा मळायला खुपच सोपे जाते आणि त्याचा मऊसर गोळा तयार होतो.

Bajari sweet bhakari soft dough

 

 

 

७) आता त्याचे दोन भाग करून जाडसर भाकरी थापा ( वाटले तर त्यावर तीळ पेरा ) ८) मग मंद आचेवर दोन्हीकडून खरपूस भाजून घ्या. भाजताना वरुन थोडे तूप लावा.

एखाद्या चटणीसोबत खा. मी लसूण, दाणे आणि लाल तिखट एकत्र वाटले आहे.

 

थापताना थेट तव्यावर ( थालिपिठाप्रमाणे ) किंवा फॉईलला तूपाचा पुसटसा हात लाऊन त्यावर थापा. कोरडे पिठ वापरायची गरज नाही आणि तव्यावर टाकल्यावर पाणी फिरवायचीही गरज नाही.

केळे कितपत मोठे आहे आणि त्याला किती पाणी सुटतेय यावर पिठ किती लागेल, ते ठरेल. त्या मिश्रणात भिजेल, एवढेच पिठ घाला. म्हणजे छान चव येते. मिरची आणि मीठ वापरले तर गोड चव मोडते, एवढेच. आवडत नसेल तर नाही वापरले तरी चालेल.

केळ्यातील गोडव्यामूळे या भाकरीला सोनेरी रंग येतो, म्हणून मंद आचेवरच भाजा. थेट आचेवर शेकू नका.

 

 

 

Sweet roti of Bajara

 

Many of us love Bajara roti. But it takes special skills and practice to make bajara roti.

This is a much easier version. I have used a banana, which not only makes it easy but also, gives the roti a sweet taste.

Bajari sweet bhakari close up

 

 

 

 

 

What you need –

 

1) 1 cup bajara flour ( you may need less or more )

2) 1 ripe banana

3) 2 teaspoon ghee

4) half green chili ( optional ), chopped

5) A pinch of salt

6) A pinch of cardamom powder

 

To make roti

 

1) Peel and chop the banana.

2) Heat 1 teaspoon ghee in a pan and add chopped chili (if using )

3) Add chopped banana, salt & cardamom powder. When the banana softens,

add the bajara flour ( dry ) to the pan.

4) Using wooden spatula, mix all together till it binds together. If you feel that the mixture is too dry, sprinkle some water.

5) Cover and cook for a minute on low flam, then put off the fire.

6) When it has cooled a little, knead it into soft dough.

7) Make two portions and make roti by hands. You can use a piece of aluminum foil, apply a little oil or ghee on it and make a roti on it. It is easier this way.   You may use a flat plate to press it down. This way also you make the roti. This roti should not be too thin.

 

8) Roast it on a griddle on both the sides by applying little ghee. (This roti should not be roasted on direct flame.)

Chili gives a nice twist of taste.

The quantity of flour will depend upon the size and softness of banana.

You can enjoy this roti with garlic chutney.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s