उपवासाची पुरणपोळी / Plantain Paratha ( sweet )

For English version, please scroll down

 

रुचिरा मधे हा पदार्थ आहे. त्यात मी किरकोळ बदल केले आहेत. राजेळी केळी म्हणजेच प्लांटेन.

 

 

keLyachee puranapoli in plate

पिवळ्या सालीची आणि आकाराने मोठी असतात. साधी केळी आणि राजेळी केळी यात मुख्य फरक म्हणजे, राजेळी केळी पिकलेली असली तरी शिजवूनच खातात. आपल्याकडे गोवा, केरळ भागात याचा जास्त वापर करतात.

 

आफ्रिकेतही ती फार लोकप्रिय आहेत. शक्यतो निखार्‍यावर भाजून खातात. इथल्या तान्ह्या बाळांचा पहिला घन आहारही हाच असतो. भारतात मिळतात त्यापेक्षा इथली केळी जास्त गोड असतात.

 

लागणारे जिन्नस असे.

 

१) २ राजेळी केळी

२) दिड कप राजगिर्‍याचे पिठ

३) पाव कप साबुदाण्याचे पिठ किंवा अरारुट किंवा शिंगाडा पिठ ( हे रुचिरात नाही. नुसत्या राजगिर्‍याच्या पिठाला चिकटपणा कमी असतो म्हणून असे चिकट पिठ घातले तर लाटायला सोपे जाते.)

४) चवीप्रमाणे साखर ( रुचिरात जेवढ्यास तेवढी साखर घ्यायला सांगितली आहे. पण ती खुप जास्त होते. भारतातली केळीही गोड असतातच. त्यामूळे गोडाचे प्रमाण बघून साखर घ्यावी )

५) तेल, तूप, मीठ

 

 

क्रमवार पाककृती

१) केळी सालासकट उकडून घ्यावीत. सोलून मायक्रोवेव्ह मधे ५ मिनिटे हाय वर आणि मग ३ मिनिटे ग्रील केली तरी चालतील ( मी तसेच केलेय. हाच पर्याय जास्त चांगला आहे. कारण त्यात पाण्याचा अंश कमी राहतो. )

keLyachee puranapoli roasted plantain

 

२) केळी गरम असतानाच ( सोललेली नसतील तर सोलून ) कुस्करून घ्यावीत. मग त्यात वापरत असाल तर साखर मिसळावी.

 

३) उकडलेली केळी असतील तर त्यात पाण्याचा अंश असतो. त्यामूळे मिश्रण मंद आचेवर घट्ट होईतो

आटवून घ्यावे. भाजलेल्या केळ्यात जर साखर घातली, तरी असे आटवून घ्यावे लागेल. भाजलेल्या केळ्यात

साखर मिसळली नाही, तर आटवायची गरज नाही.

 

४) राजगिर्‍याचे पिठ मैद्याच्या चाळणीने चाळून घ्यावे ( त्यात कधी कधी कच लागते ) मग त्यात दुसरे पिठ मिसळावे. चवीला मीठ व मोहन घालून, आधणाचे पाणी थोडे थोडे घालून मळावे. केळ्याच्या मिश्रणाचा व या भिजवलेल्या पिठाचा मऊपणा सारखाच असावा. या पिठात थोडीशी साखर घातली तर चांगली चव व रंग येतो.

 

५) मग या पिठाचे उंडे करून त्यात तेवढ्याच आकाराचा सारणाचा गोळा घालून, हळूवार हाताने लाटावी ( फार पातळ लाटू नये. )

keLyachee puranapoli gettin ready

 

 

६) तव्यावर दोन्ही बाजूने तूप सोडून भाजावी.

 

 

Plantain Paratha ( sweet )

keLyachee puranapoli close up

 

 

 

 

 

What you need

 

 

 

1) 2 ripe plantain

2) 1 ½ cup amaranth flour ( If you need these parathas for vrat or fasting, otherwise you can use all purpose flour.)

3) ¼ cup arrow root or tapioca flour ( required only if you are using amaranth flour, not needed if using all purpose flour.)

4) Sugar to taste. If the plantains are ripe and sweet, you may not need any sugar.

5) A pinch of salt

6) Oil and ghee, as required

 

To make parathas

 

1) Boil for 10 minutes or pressure cook the plantain for 5 minutes. (This is the traditional method. If you can microwave them, after peeling, that would be better choice. )

2) Peel the cooked plantain ( if not already peeled ) and mash them with fork. Check the sweetness and add sugar as per your taste. Mix well.

 

3) Now put the mixture on low flame and stir well till it forms a soft ball. ( If you have baked the plantain and not using any sugar, this step is not necessary )

 

4)   Mix little salt and oil to the flour and with adding hot water, knead a dough, which should be of the same softness, as the plantain mixture. If you add a pinch of sugar to the flour, your parathas will get a nice golden color.

 

5) Make equal number of balls of the dough and plantain mixture. Work out a bowl shape of the dough and put the ball of plantain mixture inside it. Cover the ball by stretching the dough around it. Flatten a little.

6) Roll out parathas without applying much pressure.

7) Cook them on medium flame in a pan or griddle, by applying oil or ghee on both the sides.

 

You can enjoy these parathas with any pickle.

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s