For English version, please scroll down
लागणारा वेळ:
२ तास
लागणारे जिन्नस:
खुप वर्षांपुर्वी शांता शेळके यांनी कालनिर्णय मधे हि कृती लिहिली होती. इथे अंगोलात चक्क मला बाजरी मिळाली म्हणून खुप वर्षांनी हा प्रकार करुन बघितला.
लागणारे जिन्नस असे
१) दोन कप बाजरी
२) अर्धा कप इतर धान्ये ( यात चण्याची डाळ, तांदूळ, दलिया वगैरे घ्या, मी मूगाची डाळ वापरलीय.)
३) मूठभर शेंगदाणे ( मी कूट वापरले )
४) दोन टेबलस्पून तेल
५) ४/५ लाल मिरच्या
६) एक मोठा कांदा, उभा चिरलेला
७) २ टिस्पून काळा मसाला
८) मीठ
९) वरून घेण्यासाठी तूप व कोथिंबीर
क्रमवार पाककृती:
१) बाजरी स्वच्छ धुवून पाण्यात तासभर भिजत ठेवा आणि निथळून घ्या ( चण्याची डाळ, दलिया वापरत असाल तर ते पण वेगळी भिजवा. मूगाची डाळ भिजवायची गरज नाही.)
२) फक्त बाजरी, थोडी करून मिक्सरमधून जराशी भरडून घ्या आणि पाखडून कोंडा काढून टाका
३) कूकरमधे तेलाची फोडणी करून त्यात मिरच्या परता आणि मग कांदा परता.
४) त्यात काळा मसाला परता आणि मग ५ कप पाणी ओता.
५) पाण्याला उकळी आली कि त्यात बाजरी आणि इतर जिन्नस घाला.
६) मीठ घालून नीट ढवळून घ्या व झाकण लावा आणि प्रेशर खाली १० मिनिटे शिजवा.
७) गरमागरम खिचडा वरून कोथिंबीर आणि तूप घालून खा.
अत्यंत वेगळ्या चवीचा हा पदार्थ खुपच चवदार लागतो. वाढणी/प्रमाण:
४ जणांना पुरेल
अधिक टिपा:
माहितीचा स्रोत:
वर लिहिल्याप्रमाणे
Bajara Spicy khichada
This is a spicy mix of cooked Bajara, with other ingredients and it is a very healthy breakfast for any cold morning.
What you need –
1) 2 cups bajara
2) ½ cup other pulses and grains ( You can use Chana Dal, Rice, Moong dal, daliya etc )
3) ½ cup ground nuts
4) 2 tablespoon oil
5) 4/5 Red chilies
6) 1 onion, sliced
7) 2 teaspoon goda masala OR 1 teaspoon garam masala
8) Salt to taste
9) Some ghee and fresh coriander to top
To Proceed
1) Wash and soak the bajara in water for ½ hour, wash and soak other pulses and grains separately in water.
2) Drain and grind the bajara coarsely in mixer, spread it in a flat plate, shake and blow off the husk.
3) In a pressure cooker heat some oil and fry the red chilies.
4) Add the sliced onion and fry till it turns golden brown.
5) Add the goda OR garam masala and add 5 cups water.
6) When the water boils, add bajara, other grains and pulses, ground nuts.
7) Add salt and close the lid of the cooker, and cook for 10 minutes under pressure on medium heat.
8) Turn off the heat, when the pressure drops, open the lid. Add the ghee and coriander.
If you do not like it spicy, omit the chilies, onions and salt. Add little gur or sugar. You may add little milk also. This version also tastes great.
mast prakar…photo pahun bhuk lagli.
LikeLike
Thanks Sayali
LikeLike