उकडपेंडी / Ukadpendi ( A simple but healthy breakfast of wheat flour )

For English version, please scroll down

ukaDapenDi dish

 

 

 

 

उकडपेंडी हा आपला पारंपरीक मराठी पदार्थ. पण याचे वेगवेगळे प्रकार प्रचलित आहेत. विदर्भाकडे ही बहुदा दही घालून करतात. मी केलेले व्हर्जन हे चिंचेचे पाणी वापरून केलाय. ( आपल्या नेहमीच्या पदार्थांचे स्वरुप घरोघरी वेगळे असते. अगदी मेतकूटाचेही अनेक प्रकार आहेत, असे दूर्गाबाई भागवतांनी, “खमंग” या पुस्तकात लिहिलेले आहे. )

 

 

 

याचे घटक नेहमी घरी असतात तेच पण नीट चव यायला हवी असेल तर कृती निगुतीने करावी लागते. ही खायची पद्धत पण वेगवेगळी आहे. काही ठिकाणी ती तेल लावून चांगली मळून घेऊन खातात. यासाठी कधी कधी खलदेखील ( खल बत्ता मधला खल) वापरतात. या पद्धतीत मात्र त्याची गरज नाही.

 

 

१) दोन वाट्या जाडसर कणीक ( तशी नसेल तर थोडा बारीक रवा मिसळा. मिश्र पिठे पण घेऊ शकता.)

२) १ मोठा कांदा, बारीक चिरलेला ( ऐच्छिक )

३) दोन कप चिंचेचे पातळसर पाणी ( साधारण लिंबाएवढी चिंच लागेल )

४) २ टेबलस्पून तेल

५) १ टिस्पून हळद

६) १ टिस्पून जिरे + मोहरी

७) अर्धा टिस्पून हिंग

८) २ टिस्पून लाल तिखट

९) कढीपत्ता ४/६ पाने

१०) मीठ

११) कोथिंबीर

१२) भाजलेले शेंगदाणे ( मला यात भरपूर दाणे लागतात, पण प्रमाण आवडीप्रमाणे घ्या )

 

१) तेल तापवून त्यात हिंग, हळद, जिरे, मोहरीची फोडणी करा. त्यात कढीलिंब परतून घ्या.

२) त्यावर कांदा घालून परता ( अर्थात वापरत असाल तर. सोबत लसूण देखील वापरता येतो )

३) मग त्यावर कोरडी कणीक घालूख, मंद आचेवर खमंग भाजून घ्या. ( भाजताना ती हाताला हलकी लागते व खमंग वास सुटतो )

४) मग त्यात तिखट आणि मीठ घाला.

५) मग त्यावर थोडे चिंचेचे पाणी शिंपडून घाला, आणि परता.

६) असे थोडे थोडे पाणी घालून, झाकण ठेवून, परतून कणीक शिजवून घ्या.

सगळे पाणी एकदम टाकले तर कणकेचा गोळा होईल आणि ती परत मोकळी होणे कठीण जाईल.

मग त्यावर भाजलेले दाणे घाला आणि मिसळून घ्या. वरुन कोथिंबीर घाला.

 

 

यावर कच्चे तेल पण घेतात. मी साजूक तूप घेतलेय.

अगदी पोटभरीचा प्रकार आहे हा.

 

Ukadpendi

 

ukaDapenDi close up

 

 

 

 

 

This is a traditional Maharashtrian breakfast made by using wheat flour and some other basic ingredients. In some parts curd is used, I have used tamarind water in stead.

 

What you need –

 

1) 2 Cups coarse wheat flour ( If you have fine flour, mix some semolina to it.)

2) 1 Large onion, finely chopped ( Optional )

3) 2 cups tamarind water ( soak lemon sized ball of tamarind in water and extract the pulp. Add enough water to get 2 cups. If you are using readymade tamarind pulp, mix 1 tablespoon pulp with 2 cups water.)

4) 2 tablespoon oil

5) 1 teaspoon turmeric powder.

6) 1 teaspoon mustard + cumin seeds mixed

7) ½ teaspoon asafetida

8) 2 teaspoon red chili powder

9) 4/6 curry leaves

10) salt to taste

11) Chopped coriander to top

12) Roasted peanuts, about ½ cup.

 

To proceed

1) Heat oil in a pan and when it gets hot, add asafetida, turmeric, mustard seeds and cumin seeds. Add curry leaves.

2) Add the chopped onion ( if using ) and fry till golden.

 

3) Then add the flour and roast on low flame, till it changes the colour and feels easy to hands.

4) Add salt & chili powder and mix well.

5) Now add the tamarind water little by little and roast till it gets absorbed, and then add little more

Water. ( If you add all the tamarind water at once, the wheat flour will form a ball and will not break into the texture seen in the photo. )

 

While enjoying this healthy breakfast, top it with groundnuts & chopped coriander.

A little ghee or oil can also be added.

 

 

2 thoughts on “उकडपेंडी / Ukadpendi ( A simple but healthy breakfast of wheat flour )

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s