For English version, Please scroll down
लागणारा वेळ:
२ तास
लागणारे जिन्नस:
बाजरीचा खिचडा करताना हा एक प्रकार सुचला.
लागणारे जिन्नस असे
१) २ कप बाजरी २) अर्धा कप नारळाचे दूध ३) सुपारीएवढा गूळ ( आवडीप्रमाणे कमी जास्त. मी अगदी थोडा वापरला आणि स्टीव्हीया वापरले. पण चिकटपणा यायला थोडातरी गूळ हवाच.) ४) थोडी वेलची पूड ५) ताटाला लावण्यापुरते तूप
क्रमवार पाककृती:
१) बाजरी २ तास पाण्यात भिजवा आणि पाणी घालून मिक्सरमधून वाटून घ्या. २) हे मिश्रण गाळणी तून दोन तीन वेळा गाळून घ्या. ३) वाटताना जर जास्त पाणी वापरले असेल तर हे भांडे थोडा वेळ तसेच ठेवा, वर पाणी येईल ते ओतून टाका. ४) या मिश्रणात गूळ, नारळाचे दूध व वेलचीपूड घालून जाड बुडाच्या भांड्यात आटवत ठेवा.
५) थोड्याच वेळात हे शिजून घट्ट होत जाईल ( सतत ढवळत रहा ) मिश्रणाला चमक येऊ लागली कि हे मिश्रण तूप लावलेल्या ताटात किंवा बोल मधे ओता.
६) थोड्याच वेळात हे घट्ट होऊन कडा सोडू लागते.
७) फ्रीजमधे ठेवून आणखी घट्ट होऊ द्या.
८) मग सोबत फळे वगैरे घेऊन खा. नुसतेही चांगले लागते. ज्यांना बाजरीची भाकरी आवडते त्यांना नक्कीच आवडेल.
वाढणी/प्रमाण:
४ जणांना पुरेल
अधिक टिपा:
बाजरीचे पिठ घेऊनही हा प्रकार करता येईल असे वाटतेय, पण मी प्रयोग केला नाही.
माहितीचा स्रोत:
माझे प्रयोग !
Bajara Puding
What you need .
1) 2 Cups bajara
2) ½ coconut milk
3) 1 tablespoon gur or brown sugar
4) A pinch of cardamom powder
5) Little ghee for greasing
To Proceed
1) Soak the bajara in water for two hours and then grind in a mixer, adding water as needed.
2) Strain this mixture, two to three times.
3) Keep the mixture still for ½ hour and pour off the water, which comes on top.
4) Mix gur or brown sugar, coconut milk and cardamom and keep on low heat.
5) Stir continuously till it thickens like a porridge.
6) Grease some plates or bowls and pour this mixture in them.
7) In a short time, this will start to set. Keep in refrigerator in case you prefer it cold.
8) Decorate with fruits of choice, can be had without the fruits too.