प्रेरणा – एमा दात्शी / Inspiration – Ema datshi

Ema datshi dishFor English version, please scroll down

 

एमा दात्शी ही आपला शेजारचा देश भूतानची खासियत. त्यांची नॅशनल डीश. मूळ कृती अगदी सोप्पी ( ती देतोच ) त्यातील घटकांवरून प्रेरणा घेऊन मी केलेला हा प्रकार !

 

 

लागणारे जिन्नस असे :

 

१) एक कांदा

२) एक टोमॅटो

३) हिरव्या मिरच्या ( आवडत्या प्रकारच्या आणि तितक्या संख्येत )

४) चीज ( माझ्या व्हर्जन साठी बेक करता येईल असे कुठलेही. मूळ क्रूतीसाठी ब्लु, फेटा वगैरे चालेल. पनीरही चालेल )

५) थोडेसे तेल किंवा बटर.

 

Ema datshi ingredients

 

 

क्रमवार पाककृती :

 

मूळ कृती अगदी सोप्पी आहेत. यात कांदा, टोमॅटो व बिया काढलेल्या मिरच्या असे सर्व ऊभे कापून पाण्यात शिजवतात. त्यात थोडेसे तेल किंवा बटर घालतात. हे सर्व शिजले कि त्यात चीज घालतात आणि चीज वितळले कि एमा दात्शी तयार ! हा सूप सारखा प्रकार भातासोबत खातात.

 

मी केलेला प्रकार असा :

 

१) कांदा, मिरच्या आणि टोमॅटो उभे कापून घेतले.

२) एका डिशमधे ते अरेंज करून घेतले आणि त्यावर थोडे ऑलिव्ह ऑईल घातले.

३) मग १० मिनिटे ग्रील कॉम्बो आणि १० मिनिटे ग्रील करुन घेतले.

 

Ema datshi before cheese

 

४) मग त्यावर चीज घातले आणि परत सहा मिनिटे ग्रील केले.

 

माझी ईमा दात्शी तयार !!!

Ema datshi close up

 

या पदार्थात मीठ घालायची गरज नसते ( चीजचा खारटपणा पुरतो, पण तूम्हाला वाटले तर घालू शकता. मूळ कृतीत मिरपूड वगैरे नाही, मिरच्या कमी तिखट असतील तर घालू शकता.)

 

यासोबत मी गार्लिक ब्रेड केला होता.

Ema datshi bread combo

 

त्यासाठी बटर आणि थोडे ऑलिव्ह ऑईल एकत्र करून त्यात गार्लिक प्रेस मधून काढलेला लसूण, चीज घातले. हे मिश्रण पावावर लावले. त्यावर चीज घालून ते ५ मिनिटे ग्रील केले.

 

Ema datshi garlic bread

 

हा प्रकार घरी सहज असणार्‍या ( चीज तेवढे आणावे लागेल ) घटकातून होणारा पदार्थ आहे. पोटभरीचा पण आहे.

 

Inspiration – Ema datshi

 

Ema datshi is a very popular dish of Bhutan. It is a sort of soup, made from simple ingredients like, onion, tomato, chilies and cheese. It is eaten with rice.

Taking inspiration from the ingredients, I created this dish.

 

The ingredients are –

 

1) 1 onion

2) 1 ripe tomato

3) Green chilies of your choice and quantity

4) 1 cup crumbled cheese of choice ( any variety which can be grilled. )

5) 1 Tablespoon oil or butter

 

To make this version –

1) Deseed the chilies and tomato, and cut all chilies, tomato and onion, lengthwise

2) Arrange them on a plate and pour the oil or butter over them.

3) Grill them under grill microwave combo for 10 minutes and grill for 10 minutes

(The exact time would depend on power of your microwave oven. Take care not to burn the vegetables.)

4) Spread the crumbled cheese on top and grill till the cheese melts and turns golden.

 

And it is ready.

 

I had also made garlic bread to accompany with this version of Ema datshi.

To make it, mix together 1 tablespoon of butter and 1 tablespoon olive oil and add 2 teaspoon of crushed garlic to it. Spread it over bread slices. Grill till the slices turn golden brown.

There is no need to add any salt or pepper to Ema datshi or the garlic bread. The salt from cheese and heat from pepper should be enough, unless you want it to be more salty and hot.

 

 

 

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s