गाजराचा मोरंबा / Carrots in light sugar syrup

For English version, please scroll down

gajaracha moramba dish

 

 

लागणारा वेळ:

२० मिनिटे

लागणारे जिन्नस:

 

१) पाव किलो केशरी गाजरे ( लाल किंवा दोन्ही रंगाची घेतली तरी चालतील.)

२) १५० ग्रॅम साखर ( चवीप्रमाणे कमीजास्त )

३) चिमूटभर वेलची पूड

४) पाव कप सुका मेवा. ( वगळला तरी चालेल )

५) पाव टिस्पून लिंबूफुल ( सायट्रिक अ‍ॅसिड ) किंवा अर्धा टिस्पून लिंबाचा रस

६) एक टिस्पून कॉर्नफ्लोअर ( त्या ऐवजी स्वादाची कस्टर्ड पावडर वापरली तर जास्त चांगले. मँगो किंवा ऑरेंज स्वाद जास्त योग्य.)

७) आवडत असल्यास लिंबाची किंवा संत्र्याची किसलेली साल, अर्धा टिस्पून किंवा तयार ऑरेंज पील ( टिप पहा.) बारीक तुकडे करुन.

क्रमवार पाककृती:

१) गाजराची साले काढून, बारीक चिरा ( मी पोटॅटो पीलरने तासली आणि मग त्याचे तूकडे केले. असे तूकडे एकसमान जाडीचे होतात आणि पटकन शिजतात.)

२) एका जाड बुडाच्या पातेल्यात ते तूकडे आणि ते बुडतील एवढे पाणी घ्या आणि त्यात वेलचीपूड टाका. व भांडे गॅसवर ठेवा.

३) पातळ तूकडे असल्यास उकळी आल्यानंतर २ मिनिटात शिजतात, जाड तूकडे असतील तर जरा जास्त वेळ लागेल. त्या पाण्यातले दोन टेबलस्पून पाणी, एका छोट्या बोलमधे काढून घ्या.

४) ते शिजले कि (वापरत असल्यास ) सुका मेवा व पील टाका.

५) लगेच साखर टाका, एक दोन कढ आले कि लिंबूफुल वा लिंबाचा रस टाका.

६) आणखी एक दोन कढ आले कि, बाजूला काढलेल्या पाण्यात कॉर्न फ्लोअर किंवा कस्टर्ड पावडर नीट घोळून घ्या आणि ते मिश्रण गाजराच्या मिश्रणात टाका.

७) सतत ढवळत आणखी एखादे मिनिट शिजवा. मिश्रण पारदर्शक झाले आणि चकाकी आली कि गॅस बंद करा.

वाढणी/प्रमाण:

दोन वाट्या मोरंबा होईल.

अधिक टिपा:

 

हा मोरंबा अनेक स्वादांचे मिश्रण बनून वेगळ्याच स्वादाचा होतो. रंगही छान येतो. चपातीबरोबर तर छान लागतोच, पण मला तो टॉपिंग म्हणून जास्त आवडतो. ( व्हॅनिला आईसक्रिम, शिर्‍याची मूद, घट्ट खीर, फालुदा, केक स्लाईस, पुडींग, फ्रुट सलाद, कस्टर्ड.. या सगळ्यावर छान दिसतो आणि लागतोही.) हा मोरंबा टिकाऊ नाही पण फ्रीजमधे आठवडाभर सहज राहील. जेवताना रडणारे बाळ असेल, तर चपातीबरोबर आवडीने खाईल.

 

लिंबूफुल चे साखरेसारखे स्फटीक असतात. लिंबूफुल किंवा सायट्रिक अ‍ॅसिड या नावाने मिळतात. लिंबाच्या रसाच्या ऐवजी ते कुठल्याही पदार्थात वापरता येतात. अगदी सरबतात देखील. पाकात लिंबाचा रस / लिंबूफुल ( किंवा लिक्वीड ग्लुकोज ) घातले तर पाकात साखरेचे कण होत नाहीत. व पाक प्रवाही राहतो.

सुक्यामेव्याच्या दुकानात मिक्स्ड पील / कँडीड पील या नावाने संत्राच्या / लिंबाच्या पाकवलेल्या साली मिळतात. केकमधे वगैरे वापरतात.

 

माहितीचा स्रोत:

गाजराचा पारंपारिक मोरंबा. तो टिकाऊ असतो. पण त्यात गाजराच्या वजनाएवढीच साखर घ्यावी लागते आणि पाक पक्का करावा लागतो.

 

Carrots in light sugar syrup

gajaracha moramba bowl

 

 

 

This is a quick and easy recipe of carrots. It can be eaten as a sweet dish on its own, but adds vibrant color to your deserts, if used as topping on your ice creams, puddings, cakes etc.

This recipe uses much less sugar than traditional murabba.

What you need ;

1) 250 grams orange or red carrots

2) 150 grams sugar

3) A pinch of cardamom or saffron

4) ¼ cup chopped dry fruits (optional )

5) ¼ teaspoon citric acid crystals or ½ teaspoon lime juice

6) 1 teaspoon corn flour ( If you have mango or orange flavored custard powder, you can use that)

7) ½ teaspoon lemon or orange zest ( optional. You can use candid peel also, which is readily available )

 

To proceed :

 

1) Using potato peeler, slice the carrots. I highly recommend the use of peeler. This way you get very thin strips of uniform thickness and they cook very fast.)

2) Chop those strips to get, pieces of 1 or 2 centimeters in length.

3) In a heavy bottom pan take two cups water and add cardamom or saffron and put on high flame.

4) Take the corn flour or flavored custard powder in a cup, and when the water gets little warm, add few spoonfuls to the cup and mix well.

5) When the water start boiling add the carrot pieces. The pieces will cook in about two minutes.

6) Add the peel or zest and chopped nuts, if using.

7) Add sugar and let the mixture boil for 2 minutes, then add lime juice or citric acid.

8) After a minute, add the mixture of corn flour or custard powder.

9) Stir continuously till the mixture becomes transparent, then put off the flame.

It is ready to use. Can be kept in the fridge for up to a week.

 

 

 

 

 

 

One thought on “गाजराचा मोरंबा / Carrots in light sugar syrup

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s