दही पॅटीस आणि मटार रगडा / Ragada Patice with a twist

For English version, please scroll down

 

dahi patice

 

 

 

 

लागणारा वेळ:

१.५ तास

लागणारे जिन्नस:

 

अ) रगड्यासाठी

१) २ कप पांढरे किंवा हिरवे वाटाणे ( कडधान्य )

२) अर्धी वाटी चण्याची डाळ

३) मीठ, हिंग, हळद

ब) दही पॅटीससाठी

१) उकडलेल्या बटाट्याचा लगदा, ३ कप

२) ब्रेडचा चुरा, १ कप ( कमी जास्त लागेल)

३) घरगुति चक्का, १ टेबलस्पून

४) मीठ

५) २ टिस्पून तेल ( जास्त लागू शकेल, टिप बघा. )

क) चिंचेच्या चटणीसाठी

१) लिंबाएवढ्या चिंचेचा कोळ

२) ६ सीडलेस खजूर किंवा लिंबाएवढा गूळ

ड) हिरव्या चटणीसाठी

१) ५/६ हिरव्या मिरच्या

२) एक कप चिरलेली कोथिंबीर

३) मिळाल्यास पालकाची ६/८ पाने किंवा आंबट चुक्याची १०/१२ पाने

४) एक टेबलस्पून लिंबाचा रस ( आंबट चुक्याची पाने वापरल्यास लागणार नाही.)

५) मीठ

याशिवाय वरुन घेण्यासाठी

१) लाल तिखट

२) चाट मसाला

३) पापडीचा चुरा ( मी कॉर्नफ्लेक्सचा चुरा वापरलाय )

४) कोथिंबीर

५ ) लिंबू

६) कच्चा कांदा

क्रमवार पाककृती:

या सर्वाला जरा जास्त वेळ द्यावा लागतो. म्हणून पूर्वतयारीसकट सविस्तर लिहितोय. ( म्हणजे तासाभरात सगळे आटपते.)

अ) पूर्वतयारी ( आदल्या रात्री )

१) वाटाणे व डाळ एकत्र करुन धुवून भिजवत ठेवा. ( टिन वापरल्यास फक्त डाळ भिजवावी लागेल)

२) पावाच्या ४/५ स्लाईसेस, कडा कापून फ्रिजमधे सुट्या ठेवा.

३) ४ टेबलस्पून आंबट दही, एका गाळण्यात टाकून ते गाळणे एका कपावर ठेवा, आणि हा कप फ्रीजमधे ठेवा.

४) बटाटे उकडून फ्रिजमधे ठेवा. बटाटे चिकट नसावेत. तसे असतील तर उकडतेवेळी पाण्यात भरपूर मीठ टाका.

५) खजूर पाण्यात कुस्करून त्यात चिंचेचा कोळ टाका. हे मिश्रण गाळून घ्या व त्याला १/२ कढ आणा, म्हणजे चिंचेचा कच्चट वास जातो.

ब) प्रत्यक्ष पदार्थ करताना

१) पावाचे स्लाईसेस मिक्सरमधून काढून घ्या.

२) डाळ व कडधान्यातील पाणी काढून जास्तीचे पाणी घालून गॅसवर ठेवा.

३) पावाचा चुरा, एक टिस्पून तेलावर जरा परतून घ्या. व गॅस बंद करुन तव्यातच ठेवा.

४) हिरव्या चटणीचे सर्व साहित्य ( लिंबूरस सोडून) वाटून घ्या आणि त्यात ताबडतोब लिंबूरस टाका, आणि चटणी फ्रिजमधे ठेवा. ( याऐवजी ग्रीन चिली सॉस वापरता येईल.)

५) कडधान्यातील पाण्यावर आलेला फेस आणि पाणी ओतून टाका. आता त्यात दुसरे पाणी, हिंग हळद टाकून प्रेशरकूकरमधे शिजवा. प्रेशर आल्यानंतर मध्यम आचेवर ६/८ मिनिटे शिजवा. पण प्रेशर कूकर आपोआप थंड होऊ द्या.

६) बटाट्याच्या लगद्यात चक्का मिसळा, आणि हलक्या हाताने पावाचा चुरा मिसळा. पॅटीस वळता येतील इतपतच चुरा मिसळा. चव बघून मीठ घाला. ७) पॅटीस वळा, एक सेमी जाडी ठेवा.

८) नॉन स्टीक पॅनवर अर्धा टिस्पून तेल लावून सुटे सुटे, मंद आचेवर ठेवा.

९) कुकरचे झाकण उघडा. वाटाणे मऊसर शिजलेले असले पाहिजेत. पण ते घोटू नका. जास्तीचे पाणी आटवून टाका.

१०) पॅटीस परतून घ्या.

क) खाण्यासाठी

पसरट प्लेटमधे रगडा घ्या, त्यावर पॅटीस ठेवा आणि प्रत्येकाला आपापल्या आवडीप्रमाणे चटणी वगैरे घेऊ द्या.

वाढणी/प्रमाण:

६/८ पॅटिस होतील

अधिक टिपा:

१) बाजारात मिळणारा रगडा असाच सौम्य चवीचा असतो. त्याला चव येते ती वरुन घातलेल्या चटण्यांमूळे. नेटवरच्या आणि पुस्तकातल्या बहुतेक कृती, त्यात अनेक मसाले घालायला सांगतात. आवडत असेल तर तसे करावे.

२) दह्यामूळे पॅटीसला एक वेगळी चव येते. तसेच तळताना तेलही कमी लागते. जास्त तेलात तळायचे असतील तर तसे करू शकता अर्थात दही वगळूही शकता.

३) पॅटीसच्या याच मिश्रणात थोडे जिरे टाकून, त्यात सुका मेवा, मिरची, ओले खोबरे यांचे सारण घालून, दही कबाब करता येतात. ते केचप किंवा चटणीसोबत चांगले लागतात.

४) पांढरे वाटाणे भारतात आयात केले जातात पण भारताबाहेर अनेक देशांत मिळत नाहीत. त्यामूळे मटाराचा पर्याय.

५) चणे / वाटाणे / वाल वगैरे कडधान्यातले पहिले पाणी असे फेकून दिल्यावर ती कडधान्ये पोटाला बादत नाहीत.

माहितीचा स्रोत:

मीच तो !

 

Ragada patties, with a twist

 

Ragada Patties is a popular street food of Mumbai. Pototo patties are served with gravy made of white peas, and topped with various sauces. The white peas are not easy to find outside India. I have used regular green peas, so can you. You may even use tin of green peas, but I don’t like their taste.

The patties sold in Mumbai are made with only potato, but I have added some hung curd to it, which gives it a twist.

What you need .

  1. A) For Ragada ( gravy )

1) 2 cups dried white or green peas ( If using tin, use one large tin, if using frozen peas, use 3 cups. )

2) ½ cup chana dal ( the dal is required to thicken the gravy )

3) 1 teaspoon turmeric

4) 1 teaspoon asafetida

5) Salt to taste ( Actually very little salt is used for the gravy. The toppings give necessary ting to the gravy )

  1. B) for curd patties

 

1) Mashed potato, 3 cups ( you can use potato flakes, they are more convenient )

2) Bread crumbs, about 1 cup

3) Hung curd, 1 tablespoon

4) Salt to taste

5) Oil, as required

 

  1. C) For tamarind sauce (chutney)

1) 2 tablespoon tamarind pulp

2) 6 seedless dates or gur, as per taste

 

  1. D) for green sauce (chutney)

1) 5/6 green chilies

2) 1 cup chopped coriander

3) 6/8 spinach leaves

4) 1 tablespoon lime juice

5) Salt to taste

 

Apart from these, for topping

1) Red chili powder

2) Chat masala

3) Crushed purees ( I have used corn flakes )

4) Chopped coriander

5) Chopped onion

6) Lime

To proceed

 

You need to make some preparations beforehand, so that all these things can be made in no time, when you want to eat.

 

1) Soak the peas ( if using dried ) and chana dal in water.

2) If you want to make, bread crumbs at home, keep 4/5 slices of bread, separated in refrigerator.

( cut off the edges.)

3) Pour 4 tablespoon of curd in a strainer and keep, the strainer over a bowl, in refrigerator.

4) Boil the potatoes ( should not be sticky ) and keep in refrigerator.

5) Soak the dates in water.

 

 

When you want to make the Ragada Patties

1) Grind the bread slices in mixer.

 

2) Add fresh water to the peas and keep on high flame.

 

3) Slightly brown the bread crumbs, using little oil.

 

4) Grind the chilies, coriander, spinach leaves to a fine paste and immediately add salt and lime juice to it.

 

5) Grind the dates and tamarind pulp together, add little water and boil for 2 minutes.

 

6) Now pour off the water from the peas and transfer them to a pressure cooker.

 

7) Add turmeric, asafoetida and salt to the peas. Add little water and pressure cook for 5 minutes.

 

8) Peel and mash the potatoes, add curd to it, add salt and add just enough bread crumbs so that patties can be formed. ( You may not need all bread crumbs )

 

9) Roll out flat patties and shallow fry them, using little oil. They should be golden on both sides.

 

10) Open the cooker and mix everything together. Do not mash the peas.

 

 

 

To assemble :

 

1) Take some ragada ( cooked peas ) in a plate.

2) keep 2 patties on it

3) Add the tamarind chutney and green chutney, as per taste.

4) Top up with onion, coriander, crushed cornflakes or purees, chat masala, chili powder and lime juice.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s