चना जोर गरम / Chana Jor Garam – Flattened chickpeas

For English version, please scroll down

 

 

chanja jor dish

लागणारा वेळ:

२ तास

लागणारे जिन्नस:

चना जोर गरम असे म्हणत पुर्वी दारावर एक विक्रेता येत असे. नाण्यासारखे गोलाकार केलेले चणे आणि त्यावर भरपूर मसाला आणि वर लिंबू पिळून तो देत असे. आता हा प्रकार तयार पाकिटात मिळतो. त्याची हि घरगुति कृती ( अर्थात हौशी कलाकारांसाठीच फक्त )

 

१) काबुली चणे ( म्हणजेच छोले ) पाव किलो

२) आवडीप्रमाणे तिखट, मीठ, जिरेपूड, काळे मीठ, मिरपूड यांचे मिश्रण ( चाट मसाला, पाणीपुरी मसालाही वापरता येतो.)

३) तेल

४) लिंबू

क्रमवार पाककृती:

१) आदल्या रात्री काबुली चणे भरपूर पाण्यात अर्धा पाऊण तास भिजत ठेवा.

२) मग ते चाळणीत निथळून घ्या

chanja jor drained

 

 

 

 

 

३) त्यावर एक ओला नॅपकिन झाकून ठेवा ( शक्य असल्यास रात्री उशीरा त्या नॅपकीन वर परत थोडे पाणी शिंपडा. )

४) सकाळी चण्यांना चमचाभर तेल चोळून घ्या.

 

५) मग एका कोरड्या कपड्यावर एकेक चणा ठेवून, तो बत्ता / हातोडा अश्या साधनाने ठोकून चपटा करा.

 

( चणे जर योग्य तेवढे आणि तसे भिजले असतील तर हि क्रिया अलगदपणे होते. जोर लावावा लागत नाही. ) चपटा चणा गोलाकार पण एकसंध राहतो. असे चपटे केलेले चणे थोडावेळ पसरुन ठेवा.

chanja jor flattened

 

 

 

 

६) मग पोह्याची गाळणी वापरून ( पोहे तळतो तसेच ) ते चणे तळून घ्या. ते पटकन तळले जातात. मग ते गरम असतानाच त्यावर मीठ मसाला पसरा.

७) अगदी खायच्यावेळी त्यावर लिंबू पिळून खा.

वाढणी/प्रमाण:

एक मोठी डिश भरून होतील.

अधिक टिपा:

 

१) हा प्रकार चटकदार असला तरी कोरडा असतो. त्यामूळे सोबत पाणी, ताक, चहा असे काहीतरी अवश्य घ्या. २) पारंपरिक कृतीत हे तळतातच. मी मात्र थोडे तेल शिंपडून मायक्रोवेव्ह अवन मधे ५ मिनिटे हाय वर बेक केले. ताबडतोब खाताना चवीत अजिबात फरक जाणवला नाही. पण जे उरले होते ते मात्र कडक झाले होते. तळलेले असतात ते नंतरही कुरकुरीत राहतात. त्यामुळे तळायचे का बेक करायचे, ते ठरवा.

३) प्रत्येक चणा ठोकणे हे वाटते तेवढे वेळखाऊ नाही. आपण कडवे वाल वगैरे सोलतो तसेच आहे हे. फक्त एक काळजी घ्यायची कि खाली एक फडके अंथरा. आणि घाव घालताना तो बोटाने पकडणे टाळा. फडके अंथरल्याने चणा उडत नाही.

४) हा माझा प्रांत नाही आणि सल्ला देण्याचा मला काहिही अधिकार नाही, तरीही लिहिल्याशिवाय रहावतही नाही. हा किंवा असे पदार्थ चकणा म्हणून दारू पिताना अजिबात खाऊ नयेत. असे पदार्थ तिखट, तेलकट व कोरडे असल्याने खाल्ल्यावर तहान लागते आणि ती शमवण्यासाठी जास्त दारू प्यावी लागते. दारूचा जिभेवर अंमल चढल्यावर तिखटाची संवेदना कमी होते, जास्त तिखट खाल्ले जाते पण इतर अन्न पोटात न गेल्याने अ‍ॅसिडीटी होते. तेव्हा…

माहितीचा स्रोत:

रुचिरा व माझे प्रयोग

 

Chana Jor Garam – Flattened chickpeas

 

chanja jor close up

 

 

This is a very tasty snack made from chickpeas. Now-a-days it is available I packets, but in case you want try your hand on this, read on. Actually I would say, it is fun to make these flattened chickpeas at home.

 

You will need

 

1) 250 grams of dry chickpeas ( Also known as Kabuli Chana or Chhole )

2) A mixture of salt, black salt, chili powder, black pepper powder, cumin powder etc.

( you may even use chat masala , jaljeera masala etc )

 

3) Oil as required

4) Lime juice
To make these Flattened chickpeas

 

1) On previous night, wash and soak the chickpeas in water just for 30 to 40 minutes.

2) Drain them in a collander and cover them with a wet napkin.

3) If the climate is too dry, you may need to sprinkle some water on the napkin, late night.

4) In the morning, remove the napkin and rub 1 tablespoon oil on the chickpeas.

5) Now the fun part begins. You need to hammer each and every chickpea with a hammer( or something similar ), to flatten it. It is not as difficult, as it sounds. Just follow this simple technique.

Spread a damp piece of cloth on a flat surface. Place one chickpea on it and flatten by hammering it firmly. The damp cloth will prevent them from flying around. You need to be firm, when you hit them. Soon you will master the technique and will enjoy the act.

 

6) Keep the flattened chick peas, spread in single layer in a plate.

 

7) Heat oil and with help of a slotted spoon, fry few at a time.

 

8) As the chickpeas are already dry and thin, then do not take much time to fry.

 

9) Take them out and place on kitchen toel, to absorb excess oil.

 

10) Sprinkle the spice mixture on them, when they are still hot.

 

12) Before eating add some lime juice.

 

They taste great with cup of chai ( tea ).

Take care, while hammering them. Do not try to hold them, with your fingers.

I tried baking them in microwave oven also. ( you need to sprinckle some oil on them, before putting in oven ) They were great when they were fresh, but later lost their crispiness. The fried once retained it.

So if you want to make them in advance, you are better frying them.

 

 

 

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s