For English version, please scroll down
लागणारा वेळ:
१ तास
लागणारे जिन्नस:
अ ) गोळ्यांसाठी
१) २ कप भिजवलेले छोले ( काबुली चणे ) किंवा चण्याची डाळ किंवा ताजे स्वीट कॉर्न
२) अर्धा कप कणीक किंवा बेसन किंवा बारिक रवा किंवा पावाचा चुरा ( कमी जास्त लागेल, कृती पहा )
३) अर्धा कप मेथीची पाने किंवा कोथिंबीर ( मी शेवग्याची पाने वापरली आहेत.)
४) जिरे आणि मिरे यांची भरड पूड . १ टिस्पून
५) आवडीनुसार आले, मिरची व लसूण यांचे वाटण किंवा बारीक तुकडे
६) मोहनासाठी व हाताला लावण्यासाठी तेल.. तळण्यासाठी आणखी तेल
७) चवीप्रमाणे मीठ
ब) कढीसाठी
१) दोन कप घट्ट दही ( थोडेसे आंबट असावे )
२) १ टेबलस्पून कॉर्नफ्लोअर
३) १ लहान कांदा, उभा कापून
४) एक लहान बटाटा, उभा पातळ कापून ( वगळला तरी चालेल. मी फ्लेक्स वापरले आहेत.)
५) फोडणीसाठी तेल आणि हिंग + चार सहा मिरीदाणे जरा ठेचून + २ लवंगा + १ इंच दालचिनी किंवा १ चक्रीफूल
६) चवीप्रमाणे मीठ
७) शक्यतो नको, पण हवीच असेल तर साखर.
८) वरून घेण्यासाठी लाल तिखट
क्रमवार पाककृती:
१) चणे किंवा डाळ किंवा कॉर्न भरड वाटून घ्या.
२) त्यात १ टेबलस्पून कणीक ( वा पर्याय ) आणि १ टिस्पून तेल मिसळा व बाकीचे जिन्नस मिसळा.
३) तळण्यासाठी तेल तापत ठेवा. भर तेलात तळायचे असतील तर तेवढे तेल घ्या नाहीतर सॉसपॅनमधे थोडे तेल तापवून त्यात हे गोळे, पॅनच गोलगोल फिरवून तळा.
४) तेल तापल्यावर आधी एक छोटा गोळा टाकून बघा. विरघळला तर आणखी कणीक ( वा पर्याय मिसळा ) थोडे थोडे मिसळून एकेक गोळा तळून बघा. विरघळला नाही तर जास्त गोळे तळणीत टाका.
५) हे गोळे आधी, इतकेच नव्हे तर आदल्या दिवशीही करता येतील. गरम गोळे नुसते खाण्याचा मोह आवरत नाही.
आता कढीसाठी.
६) दह्यात कॉर्नफ्लोअर व पाणी घालून नीट घोटून घ्या.
७) फोडणीत मसाले घाला व कांदा घालून परता.
८) कांदा गुलाबी झाला कि बटाट्याचे काप परता. दोन्ही सोनेरी होईस्तो परता.
९) मग त्यात पाणी घालून चांगले उकळा.
१०) त्यात मीठ घालून गॅस मंद करा व दह्याचे मिश्रण टाका. सतत ढवळत एक कढ काढा ( पण उकळू नका )
वाढताना आधी कढी, मग त्यात गोळे आणि वर लाल तिखट घाला. जिरा राईस सोबत छान लागतो हा प्रकार. नुसताही खाता येतो.
वाढणी/प्रमाण:
सहा जणांना पुरेल.
अधिक टिपा:
हे गोळे अलवार पण कुरकुरीत होतात ( व्हावेत ) म्हणून थोडीथोडी कणीक ( वा पर्याय मिसळा. )
माहितीचा स्रोत:
आयत्यावेळी सुचला तसा.
Chana kofta in yoghurt sauce
This dish was made by me for a birthday party dinner, from whatever was available in the kitchen at that time. Everybody liked it, hence I am sharing it with you.
You need ..
A ) For kofta
1) 2 cups soaked chikpeas, or chana dal or fresh sweet corn
2) ½ cup atta or bread crumbs ( You may need less or more, see the preparation.)
3) ½ cup fresh corriander or methi leaves.
4) ½ teaspoon cumin seeds and 8 to10 black pepper corns, crushed together.
5) ½ inche ginger + 4/5 garlic pods + 1 or 2 chillies, all ground or chopped together.
6) Salt to taste
7) Oil as needed.
- B) for the yoghurt sauce
1) 2 cups thick yoghurt ( should be sour )
2) 1 tablespoon cornflour
3) 1 small onion, chopped lengthwise
4) 1 small potato, cut into thin stripes
5) 1 tablespoon oil
6) ½ teaspoon asafoetida
7) 2 cloves
8) 4/6 black pepper corns, slightly crushed
9) 1 inch cinammon or 1 star anise
10) salt to taste
11) little suger, if desired
12) 1 teaspoon chili powder, to sprinkle on top
To make koftas
1) Grind the chickpeas or chana dal or corn coarsely ( You may use any combination of these too.)
2) Mix all other ingredients and 1 teaspoon of oil. ( But do not mix all the flour at once, see next 2 steps )
3) You may deep fry these koftas or shallow fry them, in pan, with very little oil. In case you choose to shallow fry them, you can shake the pan in circular fashion, after adding the koftas. This way they will brown well on all the sides.
4) Make few koftas and start frying them in whichever style you want. If they break, add some more flour to the mixture.
5) These koftas can be made ahead. Rather they should be made in advance, so that they are cooled down, at the time of serving.
To make the sauce
1) Add corn flour to the yoghurt and mix well, add little water.
2) Heat oil in the pan and add asafetida, cloves, crushed pepper corns and cinnamon (or star anis)
3) Add onion slices and fry them, till they turn golden brown.
4) Then add potato slices and fry them till they turn golden.
5) Add 2 to 3 cups water and boil till the potatoes are cooked.
6) Reduce the flame and add the yoghurt mixture.
7) Stir continuously but do not boil. Just heat till the corn flour is cooked.
8) Check the taste and if it is too sour add little suger.
To serve, take the sauce in dish, add the koftas, sprinkle with some chili powder and fresh corriander