रवा रताळे लाडू \ Sweet potato Laddu

For English version, please scroll down

 

Rawa Ratale Ladu

 

लागणारा वेळ:

१ तास

लागणारे जिन्नस:

 

१) उकडलेल्या रताळ्याचा गर, २ कप

२) २ कप अगदी बारिक रवा

३) अर्धा कप तूप (कमीजास्त लागू शकेल)

४) अर्धा कप मिल्क पावडर (किंवा पाऊण कप सायीसकट दूध)

५) आवडीप्रमाणे सुका मेवा अर्धा कप (मी बदामाचे काप आणि बेदाणे वापरलेत.)

६) वासाला वेलची पावडर

७) पाऊण कप पिठीसाखर (मी आयसिंग शुगर वापरलीय.)

 

क्रमवार पाककृती:

 

१) रताळ्य़ाची दोन्ही टोके कापून ती उकडून घ्या.

२) पाण्यातून काढून ती पूर्णपणे निथळून घ्या. (हे काम आधीच करुन ठेवा)

३) रताळ्याची साले काढून जाड्या किसणीने किसून घ्या, (दोरे काढून टाका)

४) असा गर दोन वाट्या घ्या, (गर दाबून भरू नका)

५) एक टेबलस्पून तूप वापरून रवा भाजायला घ्या, त्यातच मिल्क पावडर मिसळा. (दूध वापरणार असाल तर पुढची पायरी बघा.)

६) रवा गुलाबी रंगावरच भाजा, जास्त भाजू नका.

७) आता रवा काढून घ्या आणि त्याच भांड्यात रताळ्याचा गर भाजायला घ्या.

८) थोडे वगळून बाकीचे तूप टाका, (दूध वापरत असाल तर ते आता गरात घाला.)

९) रताळ्याचा गरही फार भाजायचा नाही, पण दूध वापरत असाल तर मिश्रण जरा आळू द्या.

१०) पण गर अगदी तूप सूटेपर्यंत भाजायचा नाही. (दूध वापरत असलात तरीही.)

११) आता रताळ्यात रवा मिसळा आणि मिश्रण मंद आचेवर नीट मिसळून घ्या.

१२) त्यातच सुका मेवा आणि वेलची पूड मिसळा आणि आच बंद करा.

१३) मिश्रण जरा थंड होऊ द्या आणि मग त्यात पिठीसाखर मिसळा पण सर्व एकदम मिसळू नका.

१४) रताळ्याच्या गोडीवर आणि तूमच्या चवीनुसारच साखर मिसळा.

१५) मग लाडू वळायला घ्या. सहसा लागणार नाहीच, पण लागलेच तर तूपाचा वापर करा.

वाढणी/प्रमाण:

कपाच्या आणि लाडवाच्या आकारानुसार, १० ते १२ लाडू होतील.

अधिक टिपा:

दिसायला सुंदर आणि चवीला अप्रतिम लागतात हे लाडू. बारिक रवा घेतल्याने तो रताळ्याच्या ओलेपणात भिजतो व कचकच लागत नाही. आमच्याकडची रताळी जास्तच गोड असतात, त्यामूळे मला साखर कमीच लागली. आयसिंग शुगर वापरायचे काही खास कारण नाही, हाताशी होती. एवढेच.

यात पाक वगैरे करायचा नसल्याने बिघडायची शक्यता नाहीच. गोडी पण आपल्याला ठरवता येते. रताळी आधी उकडून ठेवली असतील तर अर्ध्या तासात हे लाडू होतात. वळायलाही सोपे आहेत. फक्त त्रुटी एवढीच कि हे लाडू टिकणार नाहीत. बाहेर २ दिवस आणि फ्रीजमधे आठवडाभर टिकतील. जास्त टिकवण्यासाठी रताळ्याचा गर रवाळ होईपर्यंत आणि रवा सोनेरी होईपर्यंत भाजावा लागेल.

रुचिरामधे रताळ्याचा गर व वरीच्या तांदळाचा रवा वापरुन उपवासाचे लाडू दिले आहेत. पण ती कृति जरा वेगळी आहे.

 

Sweet potato Laddu

 

These are great looking and very tasty laddus.

What you need

 

1) 2 cups boiled and mashed sweet potatoes

2) 2 cups fine semolina ( Rawa )

3) ½ cup ghee ( clarified butter ). You may need less or more.

4) ½ cup good quality milk powder or ¾ cup whole milk

5) ½ cup chopped nuts

6) A pinch of cardamom powder

7) ¾ cup fine sugar

 

To make laddus

 

1) Cut both the ends of sweet potato and boil them.

 

2) Remove from water and cool them completely ( can be cooked in advance )

 

3) Peel the sweet potatoes and grate them. Remove all threads.

 

4) Take 2 cups of this grated sweet potatoes ( Do not fill the cup by pressing.)

 

5) Heat 1 tablespoon ghee ( clarified butter ) in a pan and roast the semolina ( Rawa )

to pink color. Take care not to brown it. If using, milk powder, add it to semolina,

after the semolina is done, and roast the mixture for 2 more minutes ( If using full cream milk, see the next step.)

 

6) Remove the semolina, and add the grated sweet potatoes to the same pan. Add remaining ghee ( reserve a spoonful, for later use) and roast for 2/3 minutes. Do not let it change color.

If you using milk, in place of milk powder, add it now. Mix it well and let the mixture reduce a little.

( No need for the mixture to form a ball )

 

7) Now add the semolina and keep on stirring on low flame. Add the cardamom powder and chopped nuts. Let all ingredients incorporate well and remove from fire. ( It should be still little moist. The semolina will absorb it )

 

8) Let the mixture cool a little, and then add the sugar. Do not add all of it at once. Some sweet potatoes are sweeter and you may not need all the sugar. Add the sugar, as per your taste.

 

9) Now you can start rolling the laddus. You may not need to grease your palms, but if you must, you can use the ghee, which was kept aside.

 

This will make about 10 to 12 laddus. As this recipe does not require sugar syrup, they are very easy to make. Moreover, you can control the quantity of sugar to be used. Not only they look great, they also taste great.

The only drawback is that they may not stay for more than 2 days. If you keep them in refrigerator, maybe they will stay for a week.

 

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s