केळ्याचे लाडू / Banana Laddu

For English version, please scroll down

 

 

Banana Laddu

लागणारा वेळ:

३० मिनिटे

लागणारे जिन्नस:

१) पिकलेल्या केळ्याचे बारीक तूकडे, २ कप २) बारीक रवा, १ कप ( कमी जास्त लागेल ) ३) साखर पाव कप, ( गरज भासलीच तर, मी वापरलेली नाही ) ४) ३ टिस्पून साजूक तूप ५) वासाला वेलची वा केशर ( ऐच्छिक ) ६) सजावटीसाठी सुका मेवा ७) १ टेबलस्पून मिल्क पावडर किंवा लिंबाएवढा मावा ( ऐच्छिक )

 

क्रमवार पाककृती:

 

१) एक टीस्पून तूपावर रवा गुलाबी रंगावर भाजून घ्या. ( कमीजास्त लागू शकेल, त्यामूळे कोरडा भाजलेला रवा हाताशी असू द्या ) वापरत असाल तर रवा भाजत आल्यावर त्यातच मिल्क पावडर वा मावा मिसळून घ्या, व ते सगळे नीट मिसळले कि आच बंद करा.
२) दूसर्‍या कढईत १ टीस्पून साजूक तूप टाकून केळ्याचे तूकडे टाका. डावेने ते ठेचत रहा.
३) वापरत असाल तर त्यात वेलची वा केशर टाका. ( नुसत्या केळ्याचा स्वाद चांगला लागतो. त्यामूळे वेलची, केशर वापरलेच पाहिजे असे नाही. )
४) केळ्याचा रंग बदलल्यावर त्यात साखर टाका व भराभर हलवत रहा.
५) मग त्यात रवा टाका आणि मिश्रण नीट मिसळून घ्या. मावा किंवा मिल्क पावडर वापरत असाल, तर ती आता मिसळा.
६) मिश्रण आचेवर फार आटवू नका, कारण थंड झाल्यावर ते आळते.
७) आच बंद करा व मिश्रण हाताळण्याएवढे कोमट झाले कि हाताला तूप लावून लाडू वळा व त्यावर सुका मेवा लावा.

 

हे लाडू स्वादाला फार सुंदर लागतात. मऊसर असतात. यात पाण्याचा अंश नसल्याने ३/४ दिवस टिकतील.

वाढणी/प्रमाण:

आकारानुसार ७/८ लाडू होतील.

अधिक टिपा:

 

१) साधी केळी वापरली तर साखर नाही वापरली तरी चालेल. साधारण गोड लाडू होतील. जास्त गोड हवे असतील, तर साखर वापरावी लागेल. केळ्याला व वापरत असलेल्या साखरेला जे पाणी सुटेल त्यातच रवा शिजवायचा आहे त्यामूळे रवा बारीक हवा. जाडसर कणीकही चालेल.
२) राजेळी केळी वापरली तर सुंदर रंग येईल. पण शिजल्यावर ती किंचीत आंबट होतात त्यामूळे साखर लागेलच.
३) रवा टाकल्यानंतर मिश्रण अर्ध्या मिनिटातच एकत्र व्हायला सुरवात होते ( गोळा नाही, तो करायचाही नाही ) जर मिश्रण त्यावेळी पातळच वाटले तर आणखी थोडा रवा वापरावा लागेल.
४) मी प्रयोग केला नाही, पण असेच लाडू आंबा, चिकू, पपई, स्ट्रॉबेरी यांचे होऊ शकतील असे वाटतेय.

 

 

Banana Laddu

These laddus taste great and can be made in half an hour.

What you need..

1) 2 cups pieces of very ripe banana ( you may even use over ripe ones )

2) 1 cup fine semolina ( The quantity may depend on how much moisture the bananas have. May need little more, if the bananas are too ripe. Now a days, roasted semolina is available in the market. If you have it, use it. That will save some time. )

 

3) ¼ cup sugar ( If needed, I have not used any. )

4) 3 teaspoons ghee ( clarified butter )

5) a pinch of cardamom or saffron ( optional )

6) Dry fruits to top the laddus ( optional)

7) 1 tablespoon khoya or milk powder (optional)

 

How to proceed.

 

1) In a pan heat 1 teaspoon of ghee and lightly roast the semolina. If using roasted semolina, just add to the pan and turn off the heat.

2) In a separate pan heat the balance ghee add  the banana pieces. Keep on pressing them, with spatula.

3) Soon they will become soft and change color , add the cardamom, saffron and sugar to it. ( If using ).

4) Add semolina and keep on stirring. If using khoya or milk powder, add now.

5) Mix well but turn off the heat, when it is still soft and of halawa consistency ( The semolina will absorb the moisture while cooling )

 

6) When cool enough to handle, roll out laddus. Put a piece of dry fruit, if using.

 

Tips,

  1. a) If you are using ordinary bananas, you may not need sugar at all. You can also use ripe plantain for these laddus. Those bananas will give a nice golden yellow colour to the laddus, but you will need some sugar, as the plantain become little sour on cooking.

 

  1. b) The semolina cooks and absorbs almost all the moisture from banana. In case you feel, that the mixture is too soft to form a laddu, you may add little more semolina, till the mixture is still hot.

 

  1. c) As there is no water used in this recipe, the laddus can stay up to 4 days.

 

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s