खांडोळी / khanDoLee

for English version, please scroll down

 

khandoli plateFor

 

 

 

लागणारा वेळ:

२ तास

लागणारे जिन्नस:

तुझी खांडोळी करीनया वाक्प्रचाराला जन्माला घालणारी झणझणीत खांडोळी हा विदर्भातला एक चविष्ट पदार्थ. खांडोळी अत्यंत वेळखाऊ आणि खर्चिक असली तरी पुन्हा पुन्हा करायला प्रवृत्त करणारी.. तेव्हा करून पहाच.. रसना तृप्त करणारा एक वऱ्हाडी पदार्थ म्हणजेखांडोळी‘! तसा हा आटाआटीचा वेळखाऊ पदार्थ आहे. पण तो खाल्ला की श्रम सार्थकी लागल्याची जाणीव होते. खांडोळी तसा बराच खर्चिक पदार्थ असल्यामुळे खास पाहुणे येतात तेव्हा पाहुणचारासाठी अथवा घरात कुणी गर्भारशी असेल तर तिची रसना तृप्त करावी म्हणून खांडोळी केली जाते. तिसरे महत्त्वाचे खांडोळी करण्याचे ते श्रम उपसण्याचे कारण म्हणजे घरात आजारी माणूस असेल तर त्याच्या तोंडावर चव यावी म्हणून खांडोळीचा बेत केला जातो. एरव्ही खांडोळी करण्याची चैन श्रमाच्या खिशाच्या दृष्टीनेही परवडणारी नसते. पण ज्यांना तिची चव माहीत आहे त्यांच्या नाव जरी काढले तरी तोंडाला पाणी सुटते.

khandoli top close up with plate

वरील उतारा आहे तो डॉ. प्रतिमा इंगोले यांनी लोकसत्ता मधे लिहिलेल्या एका लेखातील. हा लेख वाचेपर्यंत या नावाचा एखादा खाद्यपदार्थ असेल असे मला वाटलेही नव्हते. ( खांडोळी म्हणजे शत्रुपक्षाचे काहीतरी करायचे असते असे वाटायचे. तेही नेमके काय म्हणजे तुकडे करायचे का खिमाच करायचा ते माहीत नव्हते. )

तो लेख इथे आहे, अवश्य वाचा.

http://www.loksatta.com/chaturang-news/khane-pine-aani-khup-kahi-pratima…

हा लेख वाचून मला हा पदार्थ करून बघावासा असे वाटू लागले. मुख्य अडचण होती ती खसखस मिळवायची. इथे मला काळी खसखस मिळाली. पण तिची चव किंचीत वेगळी असते. एमिरेट्स च्या विमानाने आलो तर सामानातूनही खसखस आणता येत नाही. पण काल फ्रीजमधे खसखसीचे एक पाकिट मिळाले. मी एकदा केनया एअरवेज ने आलो होतो त्यावेळी आणले होते. अप्रुपाचे म्हणून फ्रिजमधे न वापरता ठेवले असणार बहुतेक.

बरं तो लेख ललित भाषेत लिहिलाय. नेमके प्रमाण आणि कृती नाही. त्यामूळे प्रमाण माझे मीच ठरवले. त्यातली आयत्याची म्हणजेच धिरड्याची कृती मला नीट समजली नाही. म्हणजे दोन्ही बाजूने भाजलेले धिरडे कसे चिकटवायचे ते कळले नाही, ( किंवा चिकटेल असे वाटले नाही )

तर हा माझा प्रयत्न…

घेतलेले जिन्नस असे

१) १ कप खसखस

२) अर्धा कप भोपळ्याच्या बिया ( आमच्याकडे तयार मिळतात. चण्याच्या डाळीला पर्याय म्हणून वापरल्या )

३) चार कांदे

४) १ लसणीचा गड्डा

५) १ टिस्पून जिरे पावडर

६) १ टिस्पून मिरीदाणे

७) २ लवंगा

८) २ इंच दालचिनी

९) मूठभर कोथिंबीर

१०) एक कप बेसन

११) अर्धा चमचा ओवा

१२) १ टेबलस्पून कणीक

१३) तेल

१४) तिखट ( आवडीप्रमाणे. झणझणीत चव येईल इतपत )

१५) मीठ, हळद, हिंग वगैरे

१६) २ टेबलस्पून भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट

१७) सुक्या खोबर्‍याचा किस, अर्धी वाटी

 

क्रमवार पाककृती:

१) खसखस व मगज ( किंवा चण्याची डाळ ) भिजत घाला. नंतर बारीक वाटून घ्या.

२) कांदे बारीक कापून घ्या.

३) मिरी, लवंगा व दालचिनी थोड्या तेलावर परतून त्याची बारीक पूड करा.

४) खोबर्‍याचा किस तेलात खमंग परतून घ्या.

५) कांदेही गुलाबी रंगावर परतून घ्या. कांदा खोबरे एकत्र वाटून घ्या.

६) लसूण वाटून घ्या व त्यात जिरे पावडर मिसळा.

७) तेलाची फोडणी करून त्यात लसणाचे वाटण परता.

८) मग त्यात हळद, हिंग व तिखट घालून परता.

९) मग त्यावर खसखसीचा गोळा घालून परता.

१०) त्यावर कांद्या खोबर्‍याचा गोळा घालून खमंग होईस्तो परता.

११) त्यात मीठ मिसळा, व थोडे थंड झाले त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर मिसळा.

१२) हे झालं बदगं म्हणजेच सारण. आता रस्सा करण्यासाठी यातले थोडेसे बाजूला काढून ठेवा आणि त्यात मिरी, दालचिनी लवंगेची पावडर मिसळून ठेवा.

khandoli filling in pan

 

१३) बेसन, कणीक, तिखट, मीठ, हळद असे एकत्र मिसळून घ्या, त्यात ओव्याची पूड घाला आणि त्यात तेल घालून मऊसर मळून घ्या.

 

१४) थोडा वेळ थांबून त्याचे दोन गोळे करा.

khandoli ready to roll

 

 

१५) फॉईलवर ते लंबगोल आकारात लाटून घ्या.

१६) मग त्यावर अर्धे सारण नीट पसरून घ्या.

 

khandoli roll

 

१७) या रोलची घट्ट वळकटी करा व त्याला त्रिकोणी आकार द्या. व त्याचे ३ इंच लांबीचे तूकडे करून घ्या.

१८) दुसर्‍या गोळ्याचेही असेच करा.

१९) मग हे तुकडे १० मिनिटे कूकरमधे प्रेशर न ठेवता वाफवून घ्या व थंड करत ठेवा.

२०) थोड्या तेलाची फोडणी करून त्यात रस्स्यासाठी बाजूला ठेवलेले वाटण टाका. ते जरा परतून त्यात पाणी टाका. चवीप्रमाणे तिखट मीठ घालून थोडा वेळ उकळू द्या. मग त्यात कोथिंबीर टाका. दाण्याचे कूट टाका.

२१) थंड झालेल्या खांडोळ्या थोड्या तेलात सर्व बाजूंनी परतून घ्या.

२२) या खांडोळ्या हवे तर तुकडे करून रस्स्यात मिसळा, किंवा तश्याच रस्स्यासोबत खा. रस्सा केला नाही तरी नुसत्याही या खांडोळ्या चवीला छानच लागतात.

 

वाढणी/प्रमाण:

८/१० खांडोळ्या होतील.

अधिक टिपा:

अगदी खटाटोप आहे या प्रकारात. ( तसे लेखात लिहिले आहेच ) कुणी ओरिजिनल खांडोळ्या खाल्लेले इथे असतील, तर त्यांचा प्रतिसाद मिळावा हि अपेक्षा. सुचनांचे स्वागत आहेच.

 

माहितीचा स्रोत:

लोकसत्ता मधला लेख.

 

khandoli close up

 

KhanDoLee

khanDoLee literally means mince. But this word is generally not used for the mince or kheema, which is eaten, but rather for the attack on enemy at war.

Till I read an article by Dr. Pratima Ingole, in a daily newspaper, I was not even aware that there is any dish, known by this name. According to that article, it is a very famous dish from Vidarbh ( Nagpur and surrounding area ) Though the article gives some interesting facts about this dish, it does not give detailed recipe as such.

Hence this is my adopted version. The main change I did was the replacement of besan (gram flour ) pancakes with a rolled sheet of besan. This way the khandolee is easier to handle.

The main ingredient, khus khus ( poppy seeds ) is rather difficult to obtain in few countries, outside India. Poppy seeds are banned by some airlines and some countries. But in India, getting them, should not be a problem.

This dish calls for many ingredients and lot of patience. The final product is of course worth all of it. It is generally prepared for special guests.

khandoli plate top view

 

The ingredients are..

1) 1 cup white poppy seeds

2) ½ cup pumpkin seeds ( The original recipe uses chana dal, hence you can use it )

3) 4 onions

4) 10/12 Garlic pods

5) 1 teaspoon cumin powder

6) 1 teaspoon black pepper

7) 2 cloves

8) 2 inches cinnamon

9) ½ cup chopped coriander

10) 1 cup besan ( gram flour )

11) ½ teaspoon ajwain

12) 1 tablespoon atta

13) oil, as required

14) red chili powder, to taste ( This dish is generally made, very hot )

15) ½ cup desiccated coconut

16) 2 tablespoons, coarsely ground, roasted peanuts. (can replace with crunchy peanut butter)
To make khanDoLee

1) Soak poppy seeds and pumpkin seeds ( or chana dal ) in water for half an hour and grind to a fine paste.

2) Finely chop the onions.

3) Roast the pepper corns, cloves and cinammon in little oil, and grind to a fine powder.

4) Roast the desiccated coconut to golden brown color.

5) Fry the onions in little oil, till they turn golden brown.

6) Grind garlic to fine paste and add cumin powder to it.

7) In a pan, heat little oil and fry the garlic paste, add asafetida, turmeric and chili powder to it.

8) Then add the poppy seed paste to it and fry till it oil separates.

9) Then add the onion coconut paste to it and fry till it mixes very well.

10) Add salt and when it cools down, add chopped coriander.

 

11 ) Add the pepper, clove, cinnamon powder to this, mix well and keep aside a quarter portion of this, for the gravy. The remaining quantity is to be used for the filling.

12) Mix together besan ( gram flour ), atta ( whole meal flour ), salt, chili powder, turmeric, ajwain and add little oil to it and by adding little water, knead into a soft dough, cover it and let it rest for 10 minutes.

 

13) Divide the kneaded flour into two portions and roll out one in oblong shape.

14) Spread half the filling on it into thin layer. ( leaving one centimeter space on each side.)

15) Start rolling it from one side and keep on pressing it while rolling. Give it a triangular shape.

16) Cut 3 inches pieces of this roll, and repeat the same for the remaining mixture.

17) Arrange the pieces in a greased plate and steam cook these pieces for 10 minutes ( without

putting vent weight ) Allow them to cool, and then shallow fry them, using little oil. ( This is KhanDoLee, the triangular shape helps to fry on all sides. )

18) Heat little oil in a pan and add the filling, which was kept aside. Add enough water and the coarsely ground peanuts,(or peanut butter) and boil. Add chili powder to it.

19) Serve the KhanDoLee with this gravy.

 

Gravy is optional. The pieces can be eaten as snack.

 

The recipe looks lengthy and little complicated but if you are used to multi tasking, it may not take much time.

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s