कुर्गी पापुट्टू / Coorgi Papputoo

for English Version, please scroll down

coorgi paputto dish.png

 

 

 

लागणारा वेळ:

४५ मिनिटे

लागणारे जिन्नस:

कुर्ग हा कर्नाटकमधला एक भाग असला तरी त्यांची संस्कृती थोडी वेगळी आहे. त्यांची भाषा, पेहराव आणि अर्थातच जेवणही इतर कर्नाटकापेक्षा वेगळे आहे.

आम्हाला अश्या एका फॅमिलीचा शेजार लाभला. त्या बीनांटी ( बीना आंटीचा मी केलेला शॉर्टफॉर्म ) खुपच छान स्वभावाच्या होत्या. त्यांची लेक कृपा तर तीन वर्षे अक्षरश: माझ्या अंगाखाद्यावर वाढली. पण कुर्गमधली शेतीवाडी संभाळण्यासाठी त्यांनी मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला. पुढे माझे आईबाबा त्यांच्याघरी राहूनही आले, माझे मात्र तिथे जाणे झाले नाही. आता त्या सहज साठी पासष्टीच्या असतील. त्यांना मुंबई सोडून आणि माझी त्यांची भेट होऊन आता ३० पेक्षा जास्त वर्षे झाली.

त्या शेजारी असताना त्यांचे बरेच पदार्थ चाखले. त्यांच्या गावचा खास तांदूळ, वेलची, मिरी, कॉफी, फळे त्या आम्हाला कायम देत असत.

आज त्या तांदळाचाच एक प्रकार , तिथे एक खास प्रकारचा बारीक सुगंधी तांदूळ होतो. किंचीत गोडसर चवीचा तो तांदूळ त्यांच्या अनेक पदार्थांचा बेस असतो. मुंबईत तो अर्थातच मिळत नाही, आपला आंबेमोहोर हा त्यातल्या त्यात जवळचा पर्याय.

तिथे त्यांचा तांदूळ भिजवून वाळवतात. मग तो कुटून त्याचा रवा करतात. पण हा रवा खुप जाड असतो. एका तांदळाचे फक्त तीन तुकडे हे मानक. प्रत्येक दाणा मोहरीएवढा असतो. पर्याय म्हणून इडली रवा चालू शकेल. या रव्याला ते तारी म्हणतात.हा पाप्पुट्टू पकार नाश्यालाही करतात आणि जेवणावरही.

 

लागणारे जिन्नस असे.

१) सुगंधी तांदूळ १ कप

२) ओले खोबरे १ कप

३) चिमूटभर मीठ

४) अर्धा टिस्पून साखर

५) दोन वेलच्यांचे दाणे, लाटण्याने जरा ठेचून

६ ) १ कप दूध

क्रमवार पाककृती:

१) तांदूळ धुवून १० मिनिटे भिजवून ठेवा.

२) मिक्सरमधे आधी ओले खोबरे वाटून घ्या आणि त्यातच तांदूळ घालून अगदी भरड वाटा ( इडली रवाही असाच थोडा भरडून घ्या )

३) त्यात दूध, मीठ, साखर व वेलचीचे दाणे मिसळा. २ कप पाणी घाला

४) कूकरच्या डब्यात हे मिश्रण घालून १५ / २० मिनिटे, प्रेशर न ठेवता वाफवून घ्या.

५) निवल्यावर डबा उलटा करून भाताची मूद पाडा आणि त्याचे त्रिकोणी तूकडे करून खा. ( वरच्या फोटोतला प्रकार मी कूकरमधे न करता थेट भांड्यात शिजवला आहे. मला तो थोडा करपलेला हवा होता. )

ब्रेकफास्टला खाताना त्यावर मध ( तोही तिकडचा खास असतो ) आणि तूप घालून घेतात. सोबत त्यांची कॉफी ( किंचीत जास्त भाजलेली व वेलची आणि गूळ घालून केलेली ) घेतात.

 

 

coorgi paputto served.png

 

साध्या दूधाच्या ऐवजी, नारळाचे दूध पण चालेल. ओले खोबरे अर्धे घेतले तरी चालेल.

 

 

जेवणावर हा प्रकार त्यांच्या प्रकारच्या मटणासोबत ( त्यांच्याकडे रानडुकराचे मटण पवित्र मानतात. ते सर्व सणांना आणि शुभप्रसंगी करतात. ते टिकवून ठेवलेले असते आणि शिजवताना भरपूर मिरी घालून शिजवतात. ) इथे मात्र मी त्यांच्याच प्रकारे केलेल्या डाळीसोबत फोटो देतोय.

 

आता या डाळीची कृती देणे भाग आहे.

यासाठी तूरडाळ भिजवून ठेवा. कूकरमधे मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी करा. त्यावर बारीक चिरलेला टोमॅटो परता व थोडी हळद टाका ( ते लोक आपल्यापेक्षा फार कमी हळद वापरतात ) मग त्यावर डाळ टाकून नेहमीपेक्षा जास्त पाणी टाका आणि कूकर बंद करा. प्रेशरखाली दोन मिनिटे शिजवा. कूकर उघडून त्यात मीठ घाला पण डाळ घोटू नका. ती उकळत ठेवा आणि त्यात ताजी केलेली मिरपूड टाका. या डाळीला तिखटपणा हवा तो फक्त मिरीचाच त्यामूळे ती थोडी जास्तच घाला आणि चांगली उकळा. मग त्यात एक कांदा उभा चिरून घाला आणि गॅस बंद करा ( कांदा शिजवायचा नाही ) अशी डाळ नुसती प्यायलाही खुप छान लागते.

वाढणी/प्रमाण:

सहा ते आठ जणांना पुरेल.

अधिक टिपा:

मी बासमती तांदूळ वापरलाय. तो नेमका हवा तेवढा बारीक झालेला नाही. त्यांचा तांदूळ वापरला तर हा प्रकार मऊसर शिजतो. त्या तांदळाला स्वतःचा असा एक छान स्वाद असतो.

ज्यांना आंबवलेले पदार्थ चालत नाहीत त्यांच्यासाठी हा एक छान पर्याय आहे. याला पूर्वतयारीही नाही.

माहितीचा स्रोत:

अर्थातच बीनांटी

 

Coorgi Papputoo

Coorg, a beautiful place in the state of Karnataka has a special place in my heart. Though I am not from Coorg, I am daring to write this recipe, just because I love the place and their food.

It was only recently, I visited that place, but I was very fortunate to have Coorgi neighbors, for some time. Beena auntie introduced this cuisine to us, and till date, I adore her preparations. It was, way back in the seventies, when we shared the neighborhood.

 

The rice, coffee, cardamom, black pepper which are grown there, are of best quality and full of flavor.

This special rice, forms base of many of their preparations from Papputoo to akki roti. Just last year, I had the opportunity to taste the lovely Coorgi dishes, prepared by Mrs. Rohini of Pariwar Home stay.

This recipe is just to express my gratitude.

As I said above, the special aromatic rice is the base of this preparation. The pound it into a sort of rawa, called tari. Our regular, idli rawa can be used instead, but   still, it is a compromise.

So you will need

1) 1 cup aromatic rice ( or Idli Rawa )

2) 1 cup fresh coconut, grated.

3) A pinch of salt

4) ½ teaspoon sugar

5) Seeds of two green cardamom, crushed

6) 1 Cup milk

7) Honey & ghee ( clarified butter ) to serve

To prepare

1) Wash the rice, soak in water for 10 minutes and drain.

2) Grind the fresh coconut and add rice (or idli rawa) to it and grind coarsely.

3) Add sugar, milk, salt & cardamom to it and add 2 cups water.

4) Put in a slightly greased separator of pressure cooker, and steam in the cooker ( without putting the vent weight ) for 15 to 20 minutes. ( You can also cook it without pressure cooker. Put it on medium flame, stir for few minutes till the rice is cooked half way and then keep on very low flame, covered, till done. I have cooked it, in this way. You can get a little golden crust, which I just love.)

5) Let it cool slightly and cut into wedges and top with ghee and honey ( Yes, Coorgi Honey )

 

This can be eaten with other dishes or on its own, for breakfast. And you should have a strong Coorgi coffee with it. ( You can replace milk, with light coconut milk. You can reduce the quantity of fresh coconut too.)

 

 

coorgi paputto with dal.png

 

 

 

I had part of this Papputoo, with coorgi dal. This dal is also very special and tasty. Let me share the recipe here.

Soak 1 cup of Tuvar / arhar dal in water for ten minutes. Heat little oil in pressure cooker and add

half teaspoon of mustard seeds and few curry leaves. Add ½ teaspoon turmeric powder and one finely chopped red tomato. Add soaked dal, and 2 to 3 cups water. Cook under pressure for 2 minutes and remove from fire.

When the pressure drops, open the lid and add salt, but do not beat the dal. Keep on medium flame and add freshly ground black pepper. You may use 1 or 2 teaspoons of it, depending upon your taste. This dal should be slightly hot in taste. After boiling the dal for 2 minutes, add one onion, cut lengthwise, and remove from fire ( The onion is not to be cooked completely.)

This dal can be had as soup also. It tastes great.

 

 

 

 

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s