खोबर्‍याचे पेढे / Coconut Pedha

( for recipe in English, please scroll down )

लागणारे जिन्नस:

गेल्या वर्षी मी मिल्क पावडरचे पेढे केले होते बाप्पासाठी, यावर्षी आणखी एक वेगळा प्रयोग.
आणि हे पेढे चक्क विगन झाले, म्हणजे तसे पथ्य असणार्या लोकांनाही खाता येतील.
शिवाय यात मी साखरही वापरलेली नाही ( पण ते माझी गरज म्हणून, तूम्ही वापरू शकता.)

coconut pedha

तर मी घेतलेले जिन्नस असे.

१) बाजारी खोबर्याचा किस, १ कप ( ताजा असावा, खवट वास असलेला नको.)
२) बदाम / काजू / पिस्ते , १ कप ( साले असतील तर सोलून )
३) नारळाचे दूध, १ कप
४) साखर चवीप्रमाणे, मी स्टीव्हीयाच्या ५ गोळ्या वापरल्यात ( टिप पहा )
५) वासासाठी वेलची वा इसेन्स

 

coconut pedha ingredients

क्रमवार पाककृती:

१) जो सुका मेवा वापरणार आहात ( मिश्रणही चालेल ) तो अर्धा तास भिजत ठेवा.
२) खोबर्याचा किस, कोरडाच मिक्सरवर ( इंचर वापरून ) बारीक करून घ्या.
३) मग भिजवलेला सुकामेवा, मिक्सरवर अगदी बारीक वाटून घ्या. यावेळी लागलेच तर नारळाचे दूध वापरा, पण पेस्ट अगदी बारीक झाली पाहिजे.
४) आता वाटलेले खोबरे, सुक्या मेव्याची पेस्ट आणि वापरत असाल तर साखर , सगळे एका नॉन स्टीक भांड्यात एकत्र करा. त्यातच उरलेले दूध ओता. इसेन्सही घाला.
५) अगदी मंद आचेवर मिश्रण आटवत ठेवा. सतत ढवळत रहा. पाचेक मिनिटातच मिश्रणाचा गोळा बनून भांड्यात फिरू लागेल. तो जरा मोकळा करून आणखी घट्ट करुन घ्या.

६) मिश्रण आचेवरून काढा आणि थोडे निवू द्या.

७) मग त्याचे पेढे वळा. पेढे वळताना हाताला तूप लावायची गरज नाही. मिश्रणाला थोडेसे तेल ( खोबर्याचे आणि मेव्याचे ) सुटतेच. तेवढे पुरेसे होते.

हे पेढे दिसायला तर सुंदर झालेच, पण पोतालाही हरवाळ झाले. तोंडात ठेवल्याबरोबर विरघळताहेत.
चवीलाही सुंदर झालेत. मुद्दाम सांगितल्याशिवाय, खोबर्याचे आहेत, ते कळणारही नाहीत.

वाढणी/प्रमाण:

१८ ते २० पेढे

 

आपण उकडीच्या मोदकासाठी जो चव करतो, तोच घट्टसर आटवून त्याचे पेढे, दापोली भागात करतात, असे मी वाचले होते, त्यावरून हि कल्पना सुचली.
टिकतील किती ते सांगता येत नाही, पण फ्रीजमधे २/४ दिवस राहतील. हे पेढे जरा नाजूक असल्याने एकावर एक रचता येणार नाहीत. जास्त प्रमाणात केले तर छोट्या पेपर कप्स मधे ठेवावे लागतील.
साखरेबद्दल वर लिहिले आहेच. मी स्टीव्हीयाच्या गोळ्या वापरल्या. आमच्याकडे जे टिनमधले नारळाचे दूध मिळते, त्यात गवारगम असतो. त्यानेच बहुदा पेढे वळायला मदत झाली. ताजे दूध वापरले तर साखर वापरावीच
लागेल, त्याशिवाय वळणार नाहीत. एवढ्या प्रमाणात, फिके पेढे करायचे असतील तर अर्धा कप साखर पुरेल. अर्थात हा माझा अंदाज, कुणी केले तर अवश्य लिहा.

मला तरी हा प्रकार करायला खुप सोपा वाटला. तासाभरात सर्व कृती करूनही झाली.

 

Coconut Pedha

 

For us, Pedha is associated with good news.  Let I be a birth of a baby or success in exams.

The first thing we do, is to offer the Pedhas to The God and then distribute them to family

members and friends.

Here, I am presenting a vegan version of Pedha. They almost taste like mawa Pedha. The secret is buying the best quality desiccated coconut. When you buy it, make sure it smells fresh and is pure white in color.

I also made them sugar free ( I used sweetener ) but you can use sugar. For given quantity about 1/2 cup

of sugar should be enough. You can use less or more, depending upon your taste.

The ingredients are :

1) 1 cup good quality desiccated coconut

2) 1 cup unsalted nuts of choice ( pistachio / almonds / cashews )

3) 1 cup coconut milk

4) Sugar or sweetener ( as per taste, ½ cup sugar or 4/5 sweetener tablets would be enough )

5) A pinch of cardamom or saffron ( or few drops of any other essence )

 

Method

1) Soak the nuts in water for half an hour and peel them, if needed.

2) Using the incher switch of your mixer, grind the desiccated coconut to fine powder.

3) Now grind the soaked and peeled nuts to a fine paste. You may use little coconut milk, while grinding, if needed.

4) Now in a non stick pan combine all ingredients and mix well, put on a low flame.

5) Keep on stirring with wooden spatula, within five minutes; it will start leaving the sides of the pan.

6) Remove from heat and let it cool a little. Then start rolling out Pedhas. There is no need to grease your palms, as the mixture will have enough oil from the coconut.

The taste and texture of these Pedhas is awesome. They are delicate and would melt in the mounth. They can be kept in refrigerator for 3 to 4 days, but do not stack them ( keep them spread in a plate). The coconut milk I used had gawar gum in it, and that must have helped the Pedhas to bind. If you are using sugar, it will serve the same purpose.  You can replace the coconut milk, with normal milk too.

coconut pedha close up

One thought on “खोबर्‍याचे पेढे / Coconut Pedha

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s