अ‍ॅपल रबडी / Apple Rabadi

for English version, please scroll down

 

 

appale rabadi dish

 

लागणारा वेळ:

४० मिनिटे

लागणारे जिन्नस:

अ‍ॅपल रबडी च्या नेटवरच्या ज्या रेसिपीज आहेत त्यात सफरचंद तसेच, म्हणजे न शिजवता वापरले आहे. मला हि रबडी गरम खायची होती ( आमच्याकडे थंडी पडलीय म्हणून ) म्हणून मी ते थोडे शिजवून घेतले. हाताशी होतेच म्हणून अगर अगर वापरले. तसेच ताजे दूध आटवता मिल्क पावडर वापरली. त्यामूळे हा प्रकार झटपट झाला.

 

१) गोड जातीची सफरचंदे, लहान असतील तर दोन आणि मोठे असेल तर १

 

aaple rabadi sahitya

२) लिंबाचा रस ४/५ थेंब किंवा चिमूटभर सायट्रीक अ‍ॅसिड ३) आवडत असेल तर चिमूटभर दालचिनी पावडर ( किंवा आवडता स्वाद ) ४) १ टिस्पून बारीक केलेले अगर अगर ५) एक कपभरून मिल्क पावडर ६) १ टिस्पून साखर ( अधिक आपल्या आवडीप्रमाणे, स्वीटनरही वापरता येईल.) ७) १ टिस्पून साजूक तूप

क्रमवार पाककृती:

१) एका पातेल्यात पाव कप पाणी घेऊन त्यात लिंबाचा रस ( किंवा सायट्रीक अ‍ॅसिड ) अगर अगर ( वापरत असाल तर ) आणि दालचिनी पूड ( किंवा जो स्वाद वापरत असाल तो ) एकत्र करा.

२) सफरचंद शक्य असल्यास कोअर करा ( म्हणजे मधलाच गोलाकार भाग कापून वेगळा करा. त्यासाठी एक खास उपकरण मिळते. वरच्या फोटोत पहा. ) मग ते वरील पाण्यातच किसा. सफरचंदे करकरीत किंवा पिठूळ अश्या दोन प्रकारात मिळतात. कुठलेही वापरता येईल.

३) आता हे मिश्रण शिजत ठेवा. सतत ढवळत रहा. करकरीत सफरचंदे असतील तर मिश्रण शिजायला वेळ लागेल. पिठूळ असतील तर लगेच शिजतील. शिजवून जॅम करायचा नाही. सगळे मिश्रण छान एकजीव झाले आणि पाणी आटले कि आच बंद करा. सफरचंदाच्या गोडीवर अवलंबून साखर वापरायची आहे कि नाही ते ठरवा. साखर वापरत असाल तर या मिश्रणातच घालून शिजवा. ( स्वीटनर अगदी शेवटी मिसळा. खुपशी स्वीटनर्स गरम करून चालत नाहीत. )

 

aapale rabadi cooked apple

३) एका जाड बुडाच्या पातेल्यात किंवा कढईत १ टिस्पून साखर टाका आणि मंद आचेवर ठेवा. थोड्याच वेळात साखर वितळेल आणि ती सोनेरी रंगावर जाईल. आणखी थोड्याच वेळात काही भागात तपकिरी होऊ लागेल. तसे होऊ लागले कि त्यात अर्धा कप पाणी टाका. ( हे पाणी शक्यतो लांब हाताचा डाव वापरून टाका कारण कढईचे तपमान जास्त असल्याने पाण्याची एकदम वाफ होऊन त्याचा चटका बसू शकेल. म्हणून जरी अर्धा कप पाणी टाकायचे असले तरी ते कपाने न टाकता डावेने टाका. )

४) त्यात साजूक तूप टाका. पाण्याला छान उकळी आली कि त्यात मिल्क पावडर टाका आणि डावेने भराभर ढवळा. पाणी गरम असल्याने मिल्क पावडर चटकन मिसळने आणि मिश्रणाला आटीव दूधाचा रंग आणि स्वादही येतो.

५) आच बंद करून त्यात सफरचंदाचे मिश्रण टाका आणि गरज वाटली तर हँड मिक्सरने ब्लेंड करा.

आणि चमच्या चमच्याने आस्वाद घ्या.

वाढणी/प्रमाण:

२ जणांना पुरेल

अधिक टिपा:

१) सफरचंद शिजवायचे नसेल तर मिल्क पावडरचे मिश्रण थोडे थंड झाल्यावर किस मिसळा. अगर अगर वापरत असाल तर मात्र शिजवावेच लागेल.

२) या पद्धतीने केलेली रबडी थंड होताना घट्ट होत जाते.

३) आवडते इतर फळ ( सिताफळ, चिकू, आंबा, लिची ) वापरू शकाल.

४) या तंत्राने नुसती रबडीही छान होते. मिल्क पावडर मात्र चांगल्या प्रतीची हवी. मी निडो वापरलीय.

माहितीचा स्रोत:

स्वतःची कल्पना ! ( काय राव, कधीतरी मलाबी क्रेडीट मिळूंद्या कि !!! )

 

Apple Rabadi

There is nothing like having a hot Rabadi on a cold morning. And I have used red apple

in it, this gives the extra flavor needed. Though I preferit hot, This rabadi can be served cold too, and can be made, one or two days ahead.

The original recipe requires reducing the milk on slow flame, till it is reduced to rabadi consistency. With this recipe, it can be made in less than an hour.

 

The apples you select, should be of nice red color. Some apples are crunchy and some are starchy. You can use any type. It may change the texture of rabadi a little, but will not affect the taste, to great extent. I would prefer the crunchy variety though. Most of the recipes call for uncooked apples, I have cooked them a little, and that gives a very special flavor to this rabadi.

As always, select the best quality milk powder. That is the secret of making the best apple rabadi.

If the apples you select, are sweet, you may avoid the sugar totally. You can use sweeteners too. But little sugar gives a nice color to the rabadi.

The ingredients are _

1) 250 grams red apples

2) 1 teaspoon lime juice or a few grains of citric acid

3) A big pinch of cinnamon powder ( optional, you can use any essence of your choice )

4) 1 teaspoon agar agar ( china grass ) powdered or cut up

5) 1 cup good quality milk powder

6) 1 teaspoon sugar ( or to your taste, this quantity should give you moderately sweet rabadi.)

7) 1 teaspoon ghee ( clarified butter )

 

Method

1) In a bowl take ½ cup water and add lime juice ( or citric acid ) , cinnamon powder ( or substitute) and agar agar to it.

2) core the apples and grate them into the bowl.

3) Keep the mixture on medium flame and cook till apples change the color. Do not overcook them, as they will turn into jam. ( see the photograph above.) and keep aside. If using sweeteners, add to this mixture at this stage.

4) In another heavy bottom pan add the sugar and keep on low flame. ( if not using sugar skip this step. )

5) When the sugar turns golden, add half cup water to the pan. ( If not using sugar just add water to the pan, In any case always use a long handled soup ladle to add water, and not the cup. )

6) Add the ghee to the hot water and when the water starts boiling add the milk powder. Stir vigorously. As the water is very hot, the milk powder will dissolve fast. Avoid forming of lumps. When the mixture starts bubbling, turn off the heat.

7) Cool the mixture a little and add the apple mixture to it. And your rabari is ready to serve.

You can add chopped nuts on top, if desired.   The rabari will get thicker as it cools. If you prefer a smooth rabari, you can blend it in a blender or with hand mixer.

 

aaple rbadi close up

 

 

2 thoughts on “अ‍ॅपल रबडी / Apple Rabadi

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s